अमित शहांचे संसदेत चर्चेचे आव्हान राहुल गांधी स्वीकारणार? की नुसतेच बेछूट आरोप करणार?

  • १९६२ युद्धापासूनची चर्चा करू हिंमत असेल तर संसदेत या : अमित शाह
  • चीन – पाकिस्तानधार्जिणी वक्तव्ये काँग्रेसचा नेता असा आहे ही त्यांच्या पक्षासाठी दुर्दैवी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत – चीन हिंसक संघर्षावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिणवणारे ‘Surender Modi’ ट्विट केले. या ट्विटचा अमित शाह यांनी चांगलाच समाचार घेतला. जर चर्चाच करायची असेल तर संसदेत या, १९६२ पासून आजपर्यंत काय काय घडले त्यावर चर्चा करू, असे आव्हानच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिले आहे. आता हे आव्हान राहुल गांधी स्वीकारणार की नुसतेच बेछूट आरोप करत राहणार?, असा प्रश्न देशातली जनता विचारू लागली आहे.

अमित शहा यांनी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांच्या बेछूट आरोपांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, “काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष अत्यंत घाणेरडे राजकारण करत आहेत याची मला कीव येते आहे. काँग्रेसच्या नेत्याची ट्विट्स पाकिस्तान आणि चीनला आवडत आहेत ही बाब दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा चिंतेचा विषय आहे.”

नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात करोना विरोधातील लढाई अत्यंत धैर्याने आपण लढलो आहोत. जगाच्या तुलनेत आपण करोनाशी अत्यंत उत्तमरित्या लढलो आहोत. आपल्याकडे परिस्थिती जगाच्या तुलनेत बरीच नियंत्रणात आहे, याची आठवण करून देत अमित शहा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि दिवे लावले गेले, घंटा वाजवल्या गेल्या. एकाही पोलिसाशिवाय कर्फ्यू पाळला गेला. यासारखी बाब मी तरी माझ्या कारकिर्दीत पाहिलेली नाही.”

हे सगळे मोदींच्या नेतृत्त्वामुळे शक्य झाल्याची आठवण अमित शाह यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत करवून दिलीआहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनापुढे हात टेकले हे म्हणणं साफ चुकीचे आहे असे प्रत्युत्तर अमित शाह यांनी राहुल गांधींना दिले आहे.

संसदेत चर्चेचे आव्हान राहुल यांनी स्वीकारण्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. अमित शहांचे संसदेत चर्चेचे आव्हान राहुल गांधी स्वीकारणार? की नुसतेच बेछूट आरोप करणार?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*