अनलॉक ४ : मेट्रोसह सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना मर्यादेसह परवानगी; शाळा, महाविद्यालये राहणार बंद

 • केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जाहीर
 • केंद्र सरकारची मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असुन, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्याने केंद्र सरकारने अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारने धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

 •  ३० सप्टेंबरपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद राहतील. २१ सप्टेंबरपासून धार्मिक, क्रीडा व राजकीय कार्यक्रमांमध्ये १०० लोक सहभागी होऊ शकतील.
 •  कोणालाही देशात कोठेही जाण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नाही
 •  ७ सप्टेंबरपासून टप्प्याने मेट्रो रेल्वे सुरू करण्याची परवानगी.
 • आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय दळणवळणावरही कोणतेही बंधन असणार नाही. कोणालाही देशात कोठेही जाण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
 • सर्वांना राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. सामाजिक अंतर कायम ठेवावे लागेल. दुकानांमध्ये ग्राहकांमधील सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. गृह मंत्रालय यावर लक्ष ठेवणार आहे.
 • ६५ वर्षांवरील लोक, १० वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांना आवश्यकतेशिवाय बाहेर न जाण्याचा सल्लाराज्य सरकारे यापुढे केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय स्थानिक पातळीवर लॉकडाउन लादण्यास सक्षम राहणार नाहीत. केवळ कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन लावता येईल.
 • २१ सप्टेंबरपासून ओपन एअर थिएटर उघडण्याची परवानगी.
 • शाळा, महाविद्यालयांसाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेर २१ सप्टेंबरपासून परवानगी मिळू शकते. यासाठी आरोग्य मंत्रालय स्वतंत्र एसओपी देईल.
 • सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ५०% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बोलवू शकतात.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*