हे तळीराम…लाॅकडाऊन धाब्यावर बसविणारयांच्या भाऊगर्दीने राज्यभर जमावबंदीचा फज्जा; चक्क वाहतूक कोंडीही


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर गेले दीड महिन्यापासून दारूपासून लांब राहिलेल्या तळीरामांनी सोमवार सकाळपासूनच वाईन शॉपच्या दुकानांसमोर ठिय्या मांडला. आतापर्यंत निर्मनुष्य असणारया रस्त्यांवर काही ठिकाणी तर चक्क वाहतुकीची कोंडी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. काही ठिकाणी दुकाने बंदही करावी लागली.

राज्यात रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळता इतर ठिकाणी दारू विक्रीस परवानगी देण्यात आल्याने मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून लोकांना उभं राहण्यासाठी दुकानाबाहेर ठराविक अंतरावर गोल रिंगण करण्यात आलं होतं. या रिंगणमध्ये उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. काही ठिकाणी तर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

चेंबूर कँम्प येथे अनेक दुकानाबाहेर तळीरामांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. परिणामी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना लाऊडस्पीकरवरून नियम आणि शिस्तीचं पालन करण्याचं आवाहन लोकांना करावं लागलं. काही तळीराम दुचाकींवरून आल्याने चेंबूर कँम्पमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. चेंबूर कँम्पातील वीना वाईन शॉपबाहेर अधिक गर्दी होती. तर दादर शिवाजी पार्क, काळाचौकी, घाटकोपर, कुर्ला, सायन कोळावाडा, कल्याण आणि इतर भागातही हीच परिस्थिती होती. अशीच स्थिती राज्यभर होती. सगळीकडे हेच चित्र पाहायले मिळत होते.

पुण्यामध्ये मात्र प्रशासनात समन्वय नसल्याने गोंधळाचे वातावरण होते. तळीरामांनी शहरात सकाळी ७ वाजल्यापासून वाईनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या असल्या तरी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत वाईन शॉप सुरु करता येणार नसल्याचे स्पष्ट केले जात होते.

दारू दुकाने सुरू करण्याबाबत सरकारमध्ये संभ्रम असल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्यांदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही मागणी केल्यानंतर राज्य सरकारने ती फेटाळली होती. शिवसेनेने तर अगदीच कठोर टीका केली होती. मात्र, पुन्हा चक्रे फिरली आणि दारू दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय झाला. मात्र, कोणत्या झोनमध्ये असेल वगैरे याबाबत प्रचंड गोंधळ होता. शेवटी ३ मे रोजी सायंकाळी राज्य सरकारने अगदी रेड झोन मध्येही दारूची दुकाने चालू राह

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात