आंध्र प्रदेशात भीषण गॅसगळती, १० जणांचा मृत्यू, हजारो बाधित


आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील व्यंकटपूरम गावामध्ये गुरुवारी भीषण गॅसगळतीमुळे १० जणांचा मृत्यू झाला. हजारो जण यामुळे बाधित झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून  बचावकार्य सुरू आहे.


विशेष प्रतिनिधी

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील व्यंकटपूरम गावामध्ये गुरुवारी भीषण गॅसगळतीमुळे १० जणांचा मृत्यू झाला. हजारो जण यामुळे बाधित झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.

येथील एका कारखान्यातून पहाटे 3 वाजता गॅस लीक व्हायला सुरूवात झाली. एलजी पॉलिमर्स इंडस्ट्रीच्या प्लांटमधून लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. विषारी वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमला घटनास्थळावर पाठवण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले आहे.

जवळपास 50 लोक रस्त्यावर बेशुद्ध आढळून आले. या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. व्यंकटपूरम गावाच्या जवळपास असलेल्या लोकांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे म्हटले आहे. काही लोकांना चक्करही येत आहे. काही लोकांच्या शरीरावर लाल चट्टे पडले आहेत.

एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. श्वसनास त्रास होऊ लागलेल्या शेकडो जणांना शहरातली किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुले व वृद्धांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटेनेबद्दल ट्विट केलं आहे. घटनास्थळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले असून, गृहमंत्राल व एनडीएमआयशी (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) याबाबत बोलणं झाले आहे. मी विशाखापट्टणममधील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणार्थ प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी देखील पंतप्रधान मोदींनी दुर्घनटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली असून केंद्राकडून सवोर्तोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील विशाखापट्टणम येथील परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले असून, विषारी वायू गळतीने प्रकृती बिघडलेल्यांना लवकर बरे वाटावे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात