अस्मितेला विनाकारण फुंकर म्हणजे अपयश लपविण्याचा प्रयत्न; ठाकरेंच्या नाकर्तेपणावर कॉंग्रेस प्रवक्त्यांनीच टोचले कान!


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोना एक अजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार-दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे. त्याऐवजी महाभारत की लढाई, शिवरायांचा महाराष्ट्र, लढवय्या महाराष्ट्र, या लढाईत लढणारा शूर सैनिक, अशी युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा-पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दीष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, अशा स्पष्ट शब्दात कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

महाजन हे कॉंग्रेसचे प्रवक्ते आहेत. बुद्धीवादी विचारवंत अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित केलेले प्रश्‍न राजकीय पटलावर गांभीर्याने घेतले जात आहेत. डॉ. महाजन यांनी केलेल्या टीकेच्या संदर्भाने विचार केला तर गेल्या दोन महिन्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीव्ही आणि फेसबुकच्या माध्यमातून भाषणे देण्यापलिकडे काहीच केल्याचे दिसत नाही. रूग्णांची संख्या रोज वाढत आहे आणि मुख्यमंत्री टीव्हीवरून इतिहासाचे दाखले देत आहेत, हे चित्र महाराष्ट्रातील जनता गेल्या दोन महिन्यांपासून पाहात आहे.

या पार्श्वभूमीवर या प्रकारची टीका विरोधी पक्षाने केली असती तर संकटाच्या काळात सरकारला मदत करण्यायेवजी विरोधक टीका करीत आहेत, असे वातावरण मुख्यमंत्री ठाकरे यांनी तयार केले असते. त्यामुळे ज्यांच्या टेकूवर हे सरकार टिकून आहे. त्यांच्याच प्रवक्त्यांनी केलेली टीका ठाकरे सरकारचे किती बेजबाबदारपणे काम करीत आहे, त्याचा पुरावाचा मानावा लागेल, असे ठाकरे विरोधक म्हणत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत कुणीतरी बोलायला हवे होते. ते काम सत्तेत असलेल्या आणि ज्यांच्या टेकूवर हे सरकार उभे आहे, त्या पक्षाच्या प्रवक्त्यांनीच केल्याने राज्यातील जनतेला आता वेगळे काही सांगण्याची गरज उरली नाही, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

राज्यात विशेषत: पुण्यात आणि मुंबईत कोरोनाने हा:हाकार माजवला असताना त्याचे खापर फोडत महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली करण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांची भूमिका राज्यातल्या जनतेला आवडलेली नाही. परिस्थिती कुठलीही असो संबंधित आधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यार कारवाई करण्याची भूमिका सातत्याने घेण्यात येत आहे. त्या-त्या तत्कालिक परिस्थितीत दुसऱ्याला जबाबदार धरून आपली जबाबदारी झटकण्याचे काम ठाकरे सरकार वारंवार करीत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात