गरीबांना थेट साथ… मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील अडीच कोटी जनतेला ३१६४ कोटींचा लाभ व ५० लाखांना मोफत सिलेंडर!


पंतप्रधान गरीब कल्याण निधीच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ३१ हजार कोटी रूपये थेट ३३ कोटी जनतेच्या खात्यांमध्ये हस्तांतरीत झालेत, तर ३९.२७ कोटी जणांना ४० लाख टन धान्य वाटप झाले आहे. १ लाख १० हजार टन डाळीदेखील राज्यांना दिल्या आहेत. शिवाय ३ कोटी मोफत सिलेंडर दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्रीय जनतेला सिंहाचा वाटा मिळाला आहे.


सागर कारंडे

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण निधीमधून महाराष्ट्रातील तब्बल अडीच कोटी जनतेला आतापर्यंत ३१६४ कोटी रूपयांचा लाभ आणि सुमारे ५० लाख गॅस सिलेंडर मोफत मिळालेले आहेत. त्यामध्ये ८५ लाख शेतकरी, जनधन खातेधारक असलेल्या १ कोटी ३६ लाख महिला, ११ लाख ६८ हजार वृद्ध, विधवा व दिव्यांग आणि बारा लाख बांधकाम मजुरांचा समावेश आहे. शिवाय उज्ज्वला योजनेच्या ५० लाख लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर मोफत मिळालेला आहे.   

कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये गरीब व गरजू जनतेला थेट लाभ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने १ लाख ७० हजार कोटी रूपयांचा पंतप्रधान गरीब कल्याण निधीची घोषणा केली होती. त्यामध्ये जनधन खाते असलेल्यांना तीन महिन्यांसाठी प्रत्येकी पाचशे रूपये, शेतकरयांना किसान सम्मान निधीअंतर्गंत दोन हजार रूपये, वृद्ध-विधवा-दिव्यांग यांच्यासाठी राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेतून तीन महिन्यांसाठी प्रत्येकी पाचशे रूपयांचे सानुग्रह अनुदान, बांधकाम मजुरांना अर्थसहाय्य, मनरेगावरील मजुरांच्या प्रतिदिन मजुरीमध्ये सुमारे वीस रूपयांची वाढ, प्रत्येकाला सुमारे दहा किलो मोफत अन्नधान्य, २२ लाख कोरोना लढवय्यांसाठी पन्नास लाखांचा विमा असे निर्णय त्यामध्ये जाहीर केले होते.

केंद्रीय अर्थमंत्रालयातील अतिशय विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान गरीब कल्याण निधीच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ३१ हजार कोटी रूपये थेट ३३ कोटी जनतेच्या खात्यांमध्ये हस्तांतरीत झाले आहेत, तर ३९.२७ कोटी जणांना आतापर्यंत ४० लाख टन धान्य वाटप झाले आहे. शिवाय १ लाख १० हजार टन डाळीदेखील राज्यांना दिल्या आहेत. शिवाय ३ कोटींहून अधिक मोफत सिलेंडर देण्यात आलेले आहेत.

केंद्राकडून मिळत असलेल्या या लाभांमध्ये महाराष्ट्रीय जनतेला सिंहाचा वाटा मिळालेला आहे. एकूण अडीच कोटी जणांना थेट ३१६५ कोटींचा आर्थिक लाभ व सुमारे पन्नास लाखांना मोफत सिलेंडर मिळाले आहेत. शिवाय, मनरेगाची कामे सुरू जिथे सुरू होतील, तिथेही प्रतिदिन वीस रूपयांचा ज्यादा लाभ होईल.

महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात मिळालेला आर्थिक लाभ पुढीलप्रमाणे…

महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांतील जनतेलाही थेट आर्थिक लाभ मिळत आहेत. त्यामध्ये स्वाभाविकपणे २४ कोटी लोकसंख्या असलेला उत्तर प्रदेश आहे. अन्य प्रमुख राज्यांना मिळालेला लाभ पुढीलप्रमाणे…

किमया ‘जॅम’मुळे…

इतक्या कमी कालावधीत ३३ कोटी जनतेच्या थेट बँक खात्यांमध्ये ३१ हजार कोटींहून अधिक रक्कम जमा करण्याचा चमत्कार ‘जॅम’मुळे झाला आहे. ‘जॅम’ म्हणजे जन धन, मोबाईल आणि आधार हे त्रिकूट! जनधन योजनेमध्ये जवळ ३५ कोटी जणांची बँक खाती काढण्यात आली, तर शंभर कोटींहून अधिक जणांचे आधार कार्ड काढलेले आहे आणि हे सर्व मोबाइलला लिंक करण्यात आले आहेत. त्यामुळे एका क्लिकसरशी कोट्यवधींच्या बँक खात्यांमध्ये हजारो कोटी रूपये ट्रान्स्फर करण्याची किमया साध्य होऊ शकलेली आहे. ‘जॅम’ नसते तर चीनी व्हायरसच्या या संकटांत जनतेच्या हाती थेट पैसा सोपविणे सरकारला कदापि शक्य झाले नसते. “दिल्लीतून १ रूपया पाठविला तर जनतेला पंधरा पैसे मिळतात,” असे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतून आलेली शंभर टक्के रक्कम थेट लाभार्थ्यांच्या हातात जाते… …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात