येडियुराप्पा यांची गच्छंती अटळ, सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता


विशेष प्रतिनिधी

बंगळूर : भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचनेचे पालन करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट संकेत दिले. सोमवारी ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Yeddi will resign on Monday

पत्रकारांना त्यांनी सांगितले की, ‘‘येत्या रविवारी पक्षश्रेष्ठींकडून सूचना येणे अपेक्षित आहे. ते जी सूचना किंवा संदेश देतील, त्याचे मी पालन करेन. २६ जुलैपासून पासून मी पक्षसंघटनेत लक्ष घालणार आहे. पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्याच्या कामाला मी जोमाने लागणार आहे. २६ जुलैला माझ्या मुख्यमंत्रिपदाला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत.



देशात पंचाहत्तर वर्षांपेक्षा जास्त वय झालेल्या कोणत्याच व्यक्तीला पक्षाने अधिकार दिलेला नाही. माझ्याबद्दल सहानुभूती दाखवून पक्षाने मला मुख्यमंत्रिपदावर कार्य करण्याची संधी दिली.

येडियुराप्पा म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांनी व माझ्या समर्थकांनी मुळीच गोंधळून जाऊ नये. पुढील काळात पक्ष अधिक बळकट करून पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. माझ्यासंबंधी कोणतेच जाहीर वक्तव्य करू नका. समर्थकांनी आंदोलनाचा मार्ग सोडून द्यावा.

Yeddi will resign on Monday

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात