पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या निवडणूक अर्जावर कोणत्या पेनने स्वाक्षरी करतात?; वाचा त्यांनीच सांगितलेली अनोखी कहाणी


वृत्तसंस्था

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2002 पासून ते 2019 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत जिंकत आले आहेत. मग ती गुजरात विधानसभेची निवडणूक असो अथवा लोकसभेची निवडणूक असो. त्यांनी प्रत्येक निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. With which pen does Prime Minister Narendra Modi sign his election application form?

2002 पूर्वी मोदी भाजप संघटनेच्या कामात होते. पण ते प्रत्यक्ष निवडणूक कधीच लढले नव्हते. 2002 मध्ये ते राजकोट मधून पहिल्यांदा विधान गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी स्वामीनारायण पंथाच्या प्रमुख स्वामी महाराजांनी दोन संतांकरवी त्यांना एक डबा पाठविला होता. त्यात एक पेन होते आणि त्या पेन बरोबर प्रमुख स्वामी महाराजांनी मोदींना एक निरोप पाठविला होता, आपल्या निवडणूक अर्जावर या पेनने स्वाक्षरी करा. या दोन संतांनी तो निरोप मोदींना सांगितला होता.

नरेंद्र मोदींनी प्रमुख स्वामी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्यांनी पाठविलेल्या भेटरुपी पेनने निवडणूक अर्जावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून आजतागायत म्हणजे 2019 च्या निवडणुकीपर्यंत स्वामी महाराजांनीच पाठविलेल्या पेनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवडणूक अर्जावर स्वाक्षरी करत आले आहेत.

 

प्रमुख स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दीच्या भव्य सोहळ्यात अहमदाबाद मध्ये स्वतः मोदींनीच आपल्या या निवडणूक विजय यात्रेची ही कहाणी सांगून आपल्या यशाचे रहस्य उलगडले. सन 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना राजकोट निवडणुकीत सुरू झालेली ही स्वाक्षरी कहाणी 2019 च्या काशी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंत कायम चालत आल्याचे मोदी म्हणाले.

प्रमुख स्वामी महाराजांच्या योगदानाविषयी बोलताना मोदी म्हणाले, त्यांनी आणि रामकृष्ण मिशनच्या संतांनी सनातन धर्माला नवा आयाम दिला. मंदिरांची व्यवस्था आधुनिक तर हवी पण त्यामध्ये परंपरेची उत्तम झलक दिसली पाहिजे हे स्वामीनारायण मंदिरातून आपल्याला दिसते. ही प्रमुख स्वामी महाराजांची अध्यात्मदृष्टी होय, असे मोदी म्हणाले. प्रमुख स्वामी महाराज आणि रामकृष्ण मिशनच्या संतांनी आधुनिक काळात संतत्वाची प्रचिती देणारी वेगळी व्याख्या केली, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

With which pen does Prime Minister Narendra Modi sign his election application form?

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात