का ट्रेंड होतोय #बॉयकॉटकेएफसी हॅशटॅग?


विशेष प्रतिनिधी

बंगलोर : अमेरिकन फास्ट फूड चेन कंपनी केएफसी आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मिडीयावर कंपनीच्या कर्नाटक मधील एका आउटलेटमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओ मुळे सोशल मीडियावर #बॉयकॉटकेएफसी हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसून येतोय.

Why #boycottKFC hashtag is trending?

तर काय आहे नेमकं या व्हायरल व्हिडिओमध्ये?

कर्नाटकामधील एका आउटलेटमध्ये एक महिला ग्राहक केएफसीच्या कर्मचार्यांना इंग्लिश गाण्यांऐवजी कन्नड गाणी प्ले करावीत असे सांगताना दिसून येत आहेत. यावर एफसी कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले, कर्नाटक भारतात आहे आणि इथे राहण्यासाठी व्हिसाची गरज नाही. बरोबर ना? तर हिंदी ही राष्ट्रभाषा आहे.

यावर महिला ग्राहक म्हणतेय, आम्हाला कोणत्याही राष्ट्रभाषेची गरज नाही. आम्हाला आमच्या भाषेची गरज आहे आणि कर्नाटकमध्ये आम्हाला कन्नडची गरज आहे. एक तर तुम्ही कन्नड गाणी वाजवा नाहीतर कोणतेच गाणे लावू नका. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र प्रचंड व्हायरल झालेला दिसून येतोय आणि सर्वत्र #बॉयकॉटकेएफसी हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसून येत आहे.


बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भारतात hashtag BakraLivesMatter, ट्विटरवर ट्रेंडिंग


या सर्व प्रकरणांत केएफसी ने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, केएफसी इंडिया हे पुन्हा सांगू इच्छिते की, आम्ही सर्व संस्कृती आणि भाषेचा आदर करतो. देशाच्या कायद्याचा आदर करतो. आम्ही देशातील रेस्टॉरंटमध्ये स्थानिक कायदे आणि नियमांचीदेखील पालन करतो. केएफसी बंगलोरमध्ये मागील 25 वर्षांपासून अस्तित्वात आहे. आणि भारतातील केएफसीचा प्रवास बेंगलोर मधूनच सुरू झालेला आहे. कर्नाटक हे आमच्या ब्रॅन्ड साठी फोकस मार्केट बनले आहे कारण येत्या काही वर्षात आम्ही आमचा बिझनेस विस्तारित करण्याचा विचार करत आहोत.

पुढे ते म्हणतात, सध्या आमच्याकडे एक कॉमन प्लेलिस्ट आहे. जी ऑफिशियल आणि केंद्रीय पातळीवर विकत घेतलेली आहे. आणि ही एकच प्लेलिस्ट संपूर्ण देशामध्ये सुरू असते.

Why #boycotKFC hashtag is trending?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात