चिनी देणगीचे राजीव गांधी फाऊंडेशनने नेमके काय केले?; अमित शाहांचे काँग्रेसला खडे सवाल


प्रतिनिधी

नवी दिल्ली : चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनने 1.35 कोटी रुपयांची देणगी स्वीकारली पण या देणगीचे काँग्रेसने आणि फाऊंडेशनने नेमके केले काय??, असा खडा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. What exactly did the Rajiv Gandhi Foundation do with the Chinese donation?

संसदेतील प्रश्नोत्तरांच्या तासात आज अमित शाह हे राजीव गांधी फाउंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द का केले?, या प्रश्नाचे उत्तर देणार होते. पण काँग्रेसने प्रश्नोत्तरांचा तास गोंधळ करून होऊ दिला नाही. त्यामुळे अमित शाह यांनी यासंदर्भात संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना काही प्रश्न उपस्थित केले.

चिनी दूतावासाने राजीव गांधी फाऊंडेशनला 2005 ते 2007 या दोन वर्षाच्या कालावधीत 1.35 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याचा विनियोग भारत – चीन संबंध याविषयी संशोधन करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यावेळी फाऊंडेशनने जाहीर केले होते. मग फाऊंडेशनने त्या पैशाच्या आधारे भारत आणि चीन यांच्या संबंधाचे संबंधांविषयी भरपूर संशोधन केले असेलच. त्या संशोधनाचे नेमके निष्कर्ष काय होते?? त्या संशोधनात नेमके काय सापडले??, हे काँग्रेसने जाहीर करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले.

अमित शाह म्हणाले :

  • चीन आणि काँग्रेस यांचा संबंध काय? झाकीर नाईक आणि काँग्रेसचे संबंध काय?
  • राजीव गांधी फाऊंडेशनने 2005-07 या वर्षात चिनी दूतावासाकडून मिळालेल्या 1 कोटी 35 लाख रुपयांचे काय केले?
  • भारत चीन यांच्या संबंधाविषयीचा अभ्यास करण्यासाठी या देणगीचा वापर करण्यात येईल असे फाऊंडेशनने म्हटले होते.
  • पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात हजारो किलोमीटर जमीन चीनने भारताची जमीन लुबाडली त्याविषयी संशोधनात काही माहिती आढळली असेलच, ते काँग्रेसने जाहीर करावे.
  • 1962 च्या युद्धामध्ये पंडित नेहरूंनी नेमके काय केले याविषयी संशोधनात काही आढळले असेलच. त्याचा निष्कर्ष जाहीर करावा.
  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताकडे चालून आलेली सुरक्षा परिषदेचे कायमचे सदस्यत्व पंडित नेहरूंनी चीनला बहाल करून टाकले त्याविषयी संशोधनातून काही माहिती मिळाली असेलच. ती पण जाहीर करावी.
  • राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने जुलै 2011 मध्ये झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन कडून 50 लाख रुपये परवानगीशिवाय का घेतले?, हे काँग्रेसने देशाला सांगावे.

What exactly did the Rajiv Gandhi Foundation do with the Chinese donation?

https://youtu.be/Fmh574Bq5TM

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात