विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या 85 वर्षीय आई शोवा मजूमदार यांचे त्या अमानुष हल्यानंतर काही दिवसातच निधन झाले. यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘बंगाल में अब गुंडाराज नहीं चलेगा’ असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिला आहे. West Bengal: Smriti Irani angry over death of Bengal mother
उत्तर परगणा जिल्ह्यातील निमता भागात राहणार्या शोवा मजुमदार यांच्यावर तृणमूल कार्यकर्त्यांनी एका महिन्यापूर्वी हल्ला केला होता आणि त्यांना गंभीर जखमी केले होते. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्मृती इराणी म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील एका 80 वर्षीय महिलेला तृणमूलच्या गुंडांनी निर्घृणपणे मारहाण केली आणि त्यांचा जीव गेला. त्यांचा दोष तरी काय होता? त्यांचा मुलगा, त्याचे कुटुंब हे भाजपाचे समर्थक आहेत इतकाच.
गोपाल मजूमदार हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आईवर हा हल्ला करण्यात आला . पश्चिम बंगालमधील जनता ममता बॅनर्जी यांना इशारा देत आहेत की, आता तृणमूलचा गुंडाराज बंगालमध्ये चालणार नाही.
तत्पूर्वी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या मातेच्या मृत्यूवर तीव्र शब्दांत निषेध केला . भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, वृद्ध माता शोवा मजुमदारजी यांच्या आत्म्याला देव शांती देवो.त्यांना मुलगा गोपाल हा भाजप कार्यकर्ता आहे म्हणून प्राण गमवावे लागले. त्यांचा हा त्याग कायम स्मरणात राहील. त्या बंगालच्या माता होत्या, बेटी होत्या .माता व मुलींच्या सुरक्षेसाठी भाजपा नेहमीच लढा देईल.
दरम्यान , कोलकाता येथे शोवा मजूमदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले. तसेच या अमानुष घटनेच्या विरोधात कोलकाता येथे आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता.