एक नव्हे, तर चार पाकिस्तान बनवायला निघालेल्या शेख आलमच्या विधानावरून बंगालमध्ये राजकीय रणकंदन; भाजपने केली ममतांच्या अटकेची मागणी; शेख आलमचा माफीनामा

वृत्तसंस्था

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांच्या ३० टक्के लोकसंख्येतून एक नाही, तर ४ पाकिस्तान निर्माण करण्याची विषारी भाषा बोलणारा तृणमूळ काँग्रेसचा नेता शेख आलम याच्या विधानवरून बंगालमध्ये राजकीय रणकंदन माजले आहे. भाजपने थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच अटकेचीच मागणी केली आहे. West Bengal If I have hurt the sentiments of anybody I would like to apologise TMC leader Sheikh Alam

खुद्द ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये शेख आलमविरोधात राजकीय घमासान झाले असून ममता त्याच्यावर संतापल्याचे बोलले जात आहे. शेख आलमने आपल्या विधानावरून माफी मागितली आहे.पण त्यापूर्वी, शेख आलमने तृणमूळ काँग्रेसच्या प्रचारात हिंदू – मुसलमान लोकसंख्येचा मुद्दा आणून अत्यंत विषारी भाषण केले होते. बंगालमध्ये शेख आलम याने १ नव्हे, तर ४ नवी पाकिस्तान बनविण्याची धमकी दिली होती. तो म्हणाला होता, की आम्ही मुसलमान पश्चिम बंगालमध्ये सध्या ३० टक्के आहोत. ते (हिंदू) ७० टक्के आहेत. ते भाजपचे लोक त्या ७० टक्के (हिंदू) लोकसंख्येच्या बळावर सत्तेवर येऊ पाहताहेत.

पण आम्ही ३० टक्के मुसलमान जर दुसऱ्या बाजूला (बांगलादेशाच्या बाजूला) वळलो, तर आमची म्हणजे मुसलमानांची लोकसंख्या प्रचंड वाढेल आणि आम्ही एकच नाही, तर आणखी चार पाकिस्तान बनवून दाखवू. मग ते ७० टक्के (हिंदू) लोक कुठे जातील…!! त्यांना हिंदुत्वाचा प्रचार करताना लाज वाटली पाहिजे, असे विषारी उद्गार शेख आलमने काढले होते.

शेख आलमचे हे विषारी भाषण बंगालसह संपूर्ण देशभर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर खुद्द तृणमूळ काँग्रेसमध्येही त्याच्याविषयी प्रचंड नाराजी पसरली. ममता बँनर्जी त्याच्यावर संतापल्याचे समजते. त्यानंतर शेख आलमने माफी मागितली आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांनी शेख आलमच्या विषारी भाषणावरून ममता बँनर्जी यांच्याच अटकेची मागणी केली आहे. शेख आलम हा ममतांच्या मुस्लीम वोट बँकेचा मॅनेजर आहे, अशी टीका अर्जुन सिंग यांनी केली आहे.

West Bengal If I have hurt the sentiments of anybody I would like to apologise TMC leader Sheikh Alam


आणखी वाचा …..

 

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*