ममतांचा हावड्यात व्हिलचेअरवरून फुटबॉल पास; नंदीग्राममध्ये अभूतपूर्व बंदोबस्तात उद्या मतदान; १४४ कलम लागू

वृत्तसंस्था

कोलकाता  : पश्चिम बंगालच्या निवडणूकीत उद्या सगळ्यात हाय व्होल्टेज मतदारसंघात म्हणजे नंदीग्राममध्ये मतदान होणार असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हावड्यात व्हिलचेअरवर बसून फुटबॉल खेळल्या. त्यांनी स्टेजवरूनच फुटबॉल पास समोर बसलेल्या प्रेक्षकांना दिला तेव्हा त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.West Bengal CM Mamata Banerjee passes a football to the crowd, at her public rally in Howrah.

दरम्यान, उद्या हायव्होल्टेज मतदारसंघात म्हणजे नंदीग्राममध्ये मतदान होत आहे. ममता बॅनर्जींची तेथे एकेकाळचे उजवे हात सुवेंदू अधिकारी यांच्याशी टक्कर आहे. मतदारसंघ देशातला सगळ्यात संवेदनशील बनल्याने तेथे मतदानापूर्वी १२ तास १४४ वे कलम लागू करून संचारबंदी लादण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या तुकड्या जवळपास सगळ्या बूथवर तैनात करण्यात आल्या आहेत.मतदानापूर्वीच ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात गुंडगिरीची तक्रार दाखल केली आहे. पण निवडणूक आयोग आमचे ऐकतच नाही. भाजप काय सांगेल ते ऐकतो. एवढा हतबल निवडणूक आयोग मी राजकीय आयुष्यात पाहिला नाही, अशी तक्रार ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. त्याच निवडणूक आयोगाला तृणमूळ काँग्रेसने वारंवार पत्रे लिहिली आहेत.

केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांनी संचलन केले आहे. पूर्व मिदनापूरमध्ये ३२१० मतदान केंद्रे आहेत. २२.८२ लाख मतदार आहेत. मतदानादरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये, म्हणून तमलूक आणि नंदीग्राममध्ये १४४ वे कलम लागू करून जमावबंदीचे कठोर पालन सुरू केले आहे, अशी माहिती पूर्व मिदनापूरच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी स्मिता पांडे यांनी दिली आहे.

West Bengal CM Mamata Banerjee passes a football to the crowd, at her public rally in Howrah.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*