West Bengal assembly election 2021; काँग्रेस नेत्यांचे आवाहन धुडकावून शरद पवार ममता बँनर्जींचा प्रचार करणार; १ ते ३ एप्रिल पवार बंगाल दौऱ्यावर

वृत्तसंस्था

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये येऊन आपण मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचा प्रचार करू नये, असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांना केले होते, परंतु ते धुडकावून पवार १ ते ३ एप्रिल दरम्यान बंगालच्या दौऱ्यावर जाऊन ममता बँनर्जी यांचा प्रचार करणार आहेत. West Bengal assembly election 2021; sharad pawar to campaign for mamata banerjee agaainst wish of the congress

प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार आणि बिहारमधील नेते लालूप्रसादांचे पुत्र तेजस्वी यादव यांना पत्र लिहिले होते. आपल्या सारख्या नेत्यांनी बंगालमध्ये येऊन ममता बँनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसचा प्रचार केला, तर मतदारांमध्ये संभ्रम तयार होऊ शकतो. कारण काँग्रेस बंगालमध्ये ममता बँनर्जींच्या अन्यायी आणि अत्याचारी राजवटीच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.महाराष्ट्र आणि बिहारमध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय जनता दल हे दोन्ही पक्ष काँग्रेस सोबत आहेत. त्यामुळे आपल्या सारख्या नेत्यांनी बंगालमध्ये येऊन ममता बँनर्जींचा प्रचार करणे योग्य नाही, असे प्रदीप भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले होते.

परंतु, शरद पवारांनी तरी भट्टाचार्य यांची सूचना धुडकावलेली दिसते आहे. ते १ ते ३ एप्रिल दरम्यान बंगालमध्ये प्रचाराला जाणार असून तेथे विविध सभांमध्ये ममता बँनर्जी यांचा प्रचार करतील, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

-पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाचे पुन्हा तुणतुणे

एकीकडे काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाला धुडकावून शरद पवार हे ममता बँनर्जींचा प्रचार करणार आहेत. तर दुसरीकडे त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी यूपीएचे नेतृत्व करावे, अशी सूचना यूपीएचा घटक पक्ष नसलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तिसऱ्यांदा केली आहे.

West Bengal assembly election 2021; sharad pawar to campaign for mamata banerjee agaainst wish of the congress

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*