WB Opinion Poll : अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे. बंगालमध्ये गेल्या दहा वर्षांपासून ममता बॅनर्जी यांचे सरकार आहे. परंतु यावेळी भाजपने त्यांना कडवे आव्हान दिले आहे. पक्षाने राज्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची एक संपूर्ण फौजच पाठवली आहे. भाजपच्या या कठोर मेहनतीचे फळही बंगालमध्ये दिसून येत आहे. वस्तुतः पश्चिम बंगालच्या ताज्या सर्वेक्षणात, भाजप राज्यात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. WB Opinion Poll: BJP to make history in Bengal, big blow to Mamata’s TMC
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : येत्या काही दिवसांतच पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे. बंगालमध्ये गेल्या दहा वर्षांपासून ममता बॅनर्जी यांचे सरकार आहे. परंतु यावेळी भाजपने त्यांना कडवे आव्हान दिले आहे. पक्षाने राज्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची एक संपूर्ण फौजच पाठवली आहे. भाजपच्या या कठोर मेहनतीचे फळही बंगालमध्ये दिसून येत आहे. वस्तुतः पश्चिम बंगालच्या ताज्या सर्वेक्षणात, भाजप राज्यात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणांमध्ये भाजपने 100 जागांचा आकडा ओलांडलेला दिसला आहे. नव्या जनमत सर्वेक्षणात तृणमूलच्या जवळ भाजपने आकडा गाठला आहे. ममता बॅनर्जींचा पक्ष यावेळी पहिल्यांदाच बहुमतात मागे पडण्याची शक्यता आहे.
एबीपी-सीएनएक्सचा ओपिनियन पोल
भाजप – 130 ते 140
तृणमूल – 136 ते 146
काँग्रेस व डावे – 14 ते 18
इतर – 1 ते 3
पश्चिम बंगालसाठी करण्यात आलेल्या हे ओपिनियन पोल नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. हे सर्वेक्षण सीएनएक्स आणि एबीपी न्यूजने केले आहे. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला बंगालमधील 130 ते 140 पर्यंत जागा मिळू शकतात. पूर्वीच्या काही ओपिनियन पोलमध्ये भाजपच्या जागांची संख्या खूपच कमी होती. आता भाजप टीएमसीच्या बरोबरीला आला आहे. तथापि, पहिल्या टप्प्यातील मतदानाला अद्याप पाच दिवस शिल्लक आहेत. बंगाल निवडणुका एका महिन्याहून अधिक काळ आठ टप्प्यांत होणार आहेत. ओपिनियन पोलनुसार टीएमसीला 136-146 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर, कॉंग्रेस आणि डाव्यांची आघाडीदेखील राज्यात 14-18 जागा जिंकू शकते. दुसरीकडे, इतरांना एक ते तीन जागा देण्यात आल्या आहेत.
जन की बातचा ओपिनियन पोल
भाजप – 150 ते 162 (155)
तृणमूल – 134 ते 118 (127)
काँग्रेस व डावे – 10 ते 14 (12)
जन की बात या संस्थेच्या जनमत चाचणीनुसार भाजप येथे स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. बंगालमधील 294 जागांपैकी 150 ते 162 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, तृणमूलला मात्र 118 ते 134 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे दहा वर्षांत पहिल्यांदाच ममता बहुमतापासून दूर गेलेल्या दिसून आल्या आहेत. याचा सर्वेक्षणात काँग्रेस व डाव्यांना 10 ते 14 जागा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आज की तारीख में बीजेपी बंगाल में सरकार बना रही है, बीजेपी को अकेले दम पर बहुमत।: प्रदीप भंडारी@Inkhabar @pradip103 @KailashOnline #JanKiBaatPoll pic.twitter.com/2OFsooD27p
— Jan Ki Baat (@jankibaat1) March 23, 2021
बहुमताचा आकडा मिळण्यासाठी किती जागा आवश्यक आहेत?
पश्चिम बंगालमध्ये एकूण 294, जागा आहेत, त्यापैकी कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीतकमी 188 जागा हव्या आहेत. दरम्यान, एबीपी-सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने दावा केला आहे की, त्यांनी ओपिनियन पोलसाठी 149 जागांवरील 11 हजार 920 जणांशी संवाद साधला. हा सर्व्हे 12 ते 21 मार्चदरम्यान करण्यात आला आहे. या हिशेबाने हा खूप ताजा ओपिनियन पोल आहे. यापूर्वी 2016 मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा तृणमूलचा मोठा विजय झाला होता. तृणमूलने तेव्हा 211 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. तेव्हाच डाव्यांनी 26 आणि कॉंग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या.
याआधीच्या सर्वेक्षणात ममतांना होती आघाडी
मार्चच्या पहिल्या आठवड्यात एबीपी न्यूज आणि सीएनएक्सने पश्चिम बंगालसाठी घेतलेल्या जनमत सर्वेक्षणात ममता बॅनर्जी यांचे सरकार परत येताना दिसले. या सर्वेक्षणानुसार बंगालमध्ये तृणमूलकडे 156 ते 164 जागा जाताना दिसल्या, त्याचवेळी भाजपला 102 ते 112 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. त्याच सर्वेक्षणानुसार कॉंग्रेस आणि डावे केवळ 22-30 जागा जिंकणे अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या नव्या जनमत चाचणीतील निष्कर्ष पाहता अवघ्या काही दिवसांतच भाजपने मोठा बदल घडवून आणल्याचे दिसते.
WB Opinion Poll: BJP to make history in Bengal, big blow to Mamata’s TMC
महत्त्वाच्या बातम्या
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ‘सामान्य अधिकारी स्केल – २’ पदाच्या एकूण १५० जागा ; अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल
- जेष्ठ नेते ‘आझादांना’ कॉंग्रेसने केले ‘आझाद’ : घाबरलेल्या कॉंग्रेस हायकमांडने स्टार प्रचारकांच्या यादीतून गुलाम नबी आझादांना वगळले ; ‘हा कॉंग्रेसचा अंत’ ; फोडा आणि राज्य कराचा फंडा
- वाझेने कबुल केला परमबीरसिंगांचा दावा आणि घेतले आणखी एका वजनदार मंत्र्याचे नाव, ज्यानेही दिले होते वसुलीचे टार्गेट… तो मंत्री कोण?
- भारताचा दणदणीत विजय तर पदार्पणाच्या सामन्यातच कृणालचा विश्वविक्रम ! तुफानी अर्धशतक ; बनला पहिलाच क्रिकेटर
- India Vs England 1st Odi इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्याची शानदार कामगिरी