PM Modi touches Feet Of Party Worker : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे निवडणूक सभेदरम्यान व्यासपीठावर एक अभूतपूर्व घटना पाहायला मिळाली. आठवड्याभरात चौथ्यांदा राज्याच्या दौर्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींना भाजप कार्यकर्त्याने चरणस्पर्श केला. यावर मोदींनीही उठून कार्यकर्त्याच्या पाया पडल्या. WATCH PM Modi touches Feet Of Party Worker in Kanthi Rally WB Assembly Election
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे निवडणूक सभेदरम्यान व्यासपीठावर एक अभूतपूर्व घटना पाहायला मिळाली. आठवड्याभरात चौथ्यांदा राज्याच्या दौर्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींना भाजप कार्यकर्त्याने चरणस्पर्श केला. यावर मोदींनीही उठून कार्यकर्त्याच्या पाया पडल्या.
भाजपा एक ऐसा सुसंस्कृत संगठन है, जहां कार्यकर्ताओं में एक-दूसरे के प्रति समान संस्कार का भाव रहता है।
पश्चिम बंगाल में चुनावी रैली के दौरान मंच पर जब एक भाजपा कार्यकर्ता पैर छूने आया, तो पीएम श्री @narendramodi ने भी पैर छूकर कार्यकर्ता का अभिवादन किया।#BanglarUnnotiteBJPChai pic.twitter.com/QDGSKNqbBb
— BJP (@BJP4India) March 24, 2021
हा व्हिडीओ भाजपने शेअर केला असून हे संस्कार असल्याचे म्हटले आहे. पक्षाने अधिकृत ट्विटर हँडलवरून लिहिले की, भाजप हा एक सुसंस्कृत पक्ष आहे, जिथे कार्यकर्त्यांना एकमेकांबद्दल समान आदर आहे. या सभेवेळी दिग्गज भाजप नेते नंदीग्रामचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनीही पंतप्रधान मोदींना चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला.
‘ममतांनी नंदीग्रामच्या जनतेचा अवमान केला’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ममता दीदींनी खोटे आरोप लावून नंदीग्राममधील जनतेचा अवमान केला आहे. जनता त्यांना योग्य प्रत्युत्तर देईल. 10 मार्चच्या घटनेचा संदर्भ देताना ते म्हणाले, “तुम्ही संपूर्ण देशासमोर नंदीग्राम आणि येथील जनतेला बदनाम करत आहात. ही तीच नंदीग्राम आहे, जिने तुम्हाला खूप काही दिले. नंदीग्रामचे लोक तुम्हाला माफ करणार नाहीत आणि योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. 10 मार्च रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला होता.
2 मे रोजी बंगालची जनता दीदींना करणार पायउतार
वसुली आणि भ्रष्टाचार यावरून तृणमूल कॉंग्रेसवर पंतप्रधान मोदींनी निशाणा साधत म्हटले की, भाजप राज्यातल्या प्रत्येक योजना घोटाळामुक्त करून पारदर्शकता आणेल. चक्रीवादळ एम्फनच्या मदतीची रक्कम ‘भाईपो’ (पुतण्या) खिडकीतून लुटल्याचा त्यांनी आरोप केला. पंतप्रधान म्हणाले की, ममता दुआरे सरकारबद्दल बोलत आहेत, पण 2 मे रोजी बंगालमधील जनता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. पंतप्रधानांनी 35 मिनिटांच्या भाषणात अनेक बांग्ला शब्द वापरले. शेवटी ते म्हणाले की, ‘दीदी आप खेला खेलें, हम सेवा करेंगे. दीदी की सरकार ने अंधकार दिया, हम सोनार बांग्ला देंगे’
WATCH PM Modi touches Feet Of Party Worker in Kanthi Rally WB Assembly Election
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनात महाराष्ट्र No.1 : देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील, आता ठाकरे सरकार ‘ काय ‘ करणार?
- ठाकरे – पवार सरकार अस्थिर नव्हे तर खंबीर; भाजपच्या कारस्थानाची स्वप्नपूर्ती होणार नाही; नवाब मलिका दावा
- एटीएसच्या शिवदीप लांडेची हिरोगिरी चालली नाही, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचे न्यायालयाचे आदेश
- ..तर लवकरच 47 रुपयांना मिळेल पेट्रोल, केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या- GSTमध्ये आणण्यावर चर्चा झाली तर आनंदच!
- मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द करा; ठाणे सत्र न्यायालयाचे महाराष्ट्र ATS ला महत्त्वपूर्ण आदेश