WATCH CM Pema Khandu Vs Wild : 157 किमीचा खडतर प्रवास, चिखल-जंगलातून वाट तुडवत अतिदुर्गम गावाला भेट देणारे पहिले CM ठरले पेमा खांडू

WATCH CM Pema Khandu Vs Wild The arduous Journey to visit a remote village walking through mud-forest

WATCH CM Pema Khandu Vs Wild : मुख्यमंत्री एखाद्या गावाला भेट देणार म्हटलं की, आधी तेथील रस्ता नीट आहे का, सर्व सोयी आहेत का हे पाहिलं जातं; पण चिखल-जंगलातून वाट तुडवत 157 किमीचा अवघड प्रवास करणारा मुख्यमंत्री तुम्ही पाहिलाय का? नाही ना! असे दृश्य तुम्ही बेअर ग्रिल्सच्या साहसी मालिकांमध्ये पाहिले असेल, पण अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी असा अवघड प्रवास प्रत्यक्षात केलाय. WATCH CM Pema Khandu Vs Wild The arduous Journey to visit a remote village walking through mud-forest


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एखाद्या गावाला भेट देणार म्हटलं की, आधी तेथील रस्ता नीट आहे का, सर्व सोयी आहेत का हे पाहिलं जातं; पण चिखल-जंगलातून वाट तुडवत 157 किमीचा अवघड प्रवास करणारा मुख्यमंत्री तुम्ही पाहिलाय का? नाही ना! असे दृश्य तुम्ही बेअर ग्रिल्सच्या साहसी मालिकांमध्ये पाहिले असेल, पण अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी असा अवघड प्रवास प्रत्यक्षात केलाय.

ईशान्येतील महत्त्वाचे राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशचे सीएम पेमा खांडू यांची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात पेमा खांडूंचा काफिला एका ठिकाणी चिखलात अडकल्याचे दिसतंय, अशा वेळी मुख्यमंत्री स्वत: चिखलातून जंगलातून वाट तुडवत अतिदुर्गम भागातील गावाला भेट देण्यासाठी चालत असल्याचं दिसतंय. एवढेच नव्हे, तर ते सुरक्षा कर्मचार्‍यांना गाडीला चिखलातून बाहेर काढण्यासही मदत करताना दिसतायत.

विजयनगर या तिन्ही बाजूंनी म्यानमार बॉर्डरने वेढलेल्या अतिदुर्गम भागातील गावाला भेट देण्यासाठी ते गेले होते. मियाओ ते विजयनगरपर्यंतचे अंतर 157 किमी आहे. असे असले तरी चिखल आणि आडवळणाची वाट यामुळे त्यांना या प्रवासाला दोन दिवस लागले. 25 मार्च रोजी पहाटे पाच वाजता देबनहून सुरू झालेला त्यांचा प्रवास गांधीग्रामला (137 किमी) रात्रीच्या विश्रांतीसाठी पोहोचला आणि दुसर्‍या दिवशी विजयनगरला रवाना झाला.

विजयनगर हा अतिदुर्गम भाग आहे

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी चांगलंग जिल्ह्यातील दुर्गम भागातील विजयनगर येथे जाऊन तेथील योबिन जमातीच्या नागरिकांशी संवाद साधला. आजपर्यंत या अतिदुर्गम भागाला कोणत्याही मुख्यमंत्र्याने भेट दिलेली नाही. या ठिकाणासाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नाही. येथे पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना लवकरच प्रशस्त रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, येथे रस्ता झाल्यावर स्थानिकांना मोठा फायदा होईल आणि तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.

विजयनगरच्या डोंगराळ प्रदेशावर हवाई मार्गाने पोहोचता येते, परंतु यामुळे तेथील रहिवाशांची मोठी अडचण होतेय. विजयनगरच्या लँडिंग ग्राउंडवर लढाऊ विमाने आणि मोठी मालवाहू विमाने उतरतात. भारतीय हवाई दल आणि भारतीय सैन्याने 2019 मध्ये हे लँडिंग ग्राऊंड अपग्रेड केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे विजयनगरवासीय हरखून गेल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या कठीण प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री असावा तर असा, अशीच चर्चा ज्याच्या-त्याच्या तोंडी आहे.

WATCH CM Pema Khandu Vs Wild The arduous Journey to visit a remote village walking through mud-forest

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी