VEGAN-VIRUSHKA : No-Non-Veg…No-Meat-Diet ! अनुष्का-विराट का झाले वेगन? वेगन नक्की आहे काय?


व्हिगन डाएट’ (Vegan Diet) म्हणजे फक्त शाकाहारी जेवण. यामध्ये मांस, मासे यांच्यासोबतच इतर कोणतेही प्राणीजन्य पदार्थ म्हणजे दूध, दही, बटर, मध यांचंही सेवन करण्यात येत नाही.


मांस शिजवल्यामुळे वातावरणात कार्बन फूटप्रिंटचं प्रमाण वाढतं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्नधान्य आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार वेगन आहारामुळे पर्यावरणातील कार्बन फूटप्रिंटचं प्रमाण कमी होईल. शिवाय शेती आणि शेतकऱ्यांना फायदा होतो.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: विराट कोहलीचे अनुष्का सोबत लग्न झाल्यानंतर त्याने “वेगन” म्हणजेच नॉन व्हेज पदार्थ खाणे सोडले होते. त्याने त्याच्या आहार शाकाहारी केला होता. आता अनुष्का आणि विराट यांनी पुन्हा एका व्हिडीओ द्वारे आपण मांसाहार पूर्णपणे बंद केल्याचे सांगितले आहे.VIRUSHKA:No-Non-Veg…No-Meat-Diet ! What is VEGAN DIET?

विराट आणि अनुष्काने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत सांगितले कि “विराट आणि मी नेहमी विचार करत असतो कि आपल्या पृथ्वीतलावर आपण सगळे अधिक चांगला प्रभाव कसा निर्माण करू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ते एक चांगले स्थान कसे बनवू शकतो यात बदल घडवण्यासाठी आम्ही एक पाऊल उचलले आहे जो म्हणजे प्लॅन्ट फॉरवर्ड डाएटचा अवलंब करणे, याचा अर्थ अजिबात मांस न खाणे. आणि हे अवलंबण्याचा हेतू केवळ प्राण्यांवरील प्रेम असल्यामुळेच नाही तर मांसाच्या सेवनाचा पृथ्वीवर होणारा परिणाम देखील आहे.”

https://www.instagram.com/tv/CZs_BPFJ3Zj/?utm_source=ig_web_button_share_sheet

टेनिसपटू सेरेना विलियम्सने गरोदरपणात तिच्या आहारात बदल केला आणि आता ती पूर्णपणे ‘व्हिगन’ आहार घेते. व्हिगन म्हणजे शाकाहार तर असतोच. पण त्यात दूध, दही, तूप, बटर, ताक, मलई आणि पनीरही सोडावं लागतं. इतकंच काय मधही वर्ज्य असतं.

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीसुद्धा गेम सीजनमध्ये व्हिगन आहारावर होता. त्यावेळी सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटलं. कारण तो अर्जेंटिनाचा आहे आणि दक्षिण अमेरिकेत शाकाहारी जेवण मिळणं कठीण असतं.

याच रांगेत जेव्हा विराट कोहलीचं नाव जोडलं गेलं, तेव्हा तो वेगन का झाला, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

*फलाहार आणि मंद आचेवर शिजलेल्या भाज्या खाणं
*ज्वारी, बाजरी, गहू, मक्का आणि डाळी यांचं सेवन आणि त्यासोबत *अव्होकॅडोसारखी हाय-फॅट फळ घेणं.

व्हिगन आहार वजन नियंत्रणात ठेवतो

व्हिगन आहारात विटॅमिनसोबतच फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे वजय नियंत्रणात ठेवता येतं. फायबरयुक्त आहारामुळे कमी जेवूनही पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाल्लंही जात नाही.

मांसाहारामध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रोटीन असतं आणि खेळाडूला प्रोटिनची सर्वाधिक आवश्यकता असते. मांसाहार बंद केला तर शरिराला प्रोटीन कुठून मिळणार?

व्हिगन आहारामुळे रक्तशर्करा म्हणजे ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते. यामुळे मधुमेह म्हणजेच डायबीटीज होण्याची शक्यता खूप कमी होते. मात्र जे प्रोटीन प्राण्यांपासून उत्पादित पदार्थांमधून मिळतं त्याची कमतरता कशी भरून निघणार?

मांस, दूध, अंडी आणि माशांमध्ये मुबलक प्रमाणात पॉझिटिव्ह नायट्रोजन आणि अमायनो अॅसिड्स असतात.

ही कमतरता दूर करण्यासाठी कोणत्या वेगन पदार्थांमध्ये या अन्नघटकांचं प्रमाण अधिक आहे आणि ते पदार्थ तुमच्या आहारात कसे समाविष्ट करता येतील, याची माहिती तुम्हाला हवी. विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूंकडे आहारतज्ज्ञांची टीम असते.

यावर पर्याय…

प्लांट बेस्ड मीट उत्पादनं निर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपनी ब्ल्यू ट्राईबमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीनं गुंतवणूक केली आहे.

दोघांनी ब्ल्यू ट्राईबमध्ये मोठी गुंतवणूक केलेली असून हेच दाम्पत्य कंपनीसाठी ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून काम करेल. लोकांनी त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करावेत, जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी पावलं उचलावीत यासाठी आवाहन करण्याचं काम ब्ल्यू ट्राईबनं सर्वप्रथम केलं. पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी ब्ल्यू ट्राईबनं प्लांट बेस्ड मीटचा विषय मांडला होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पशुप्रेमी आहेत. ते दोघेही शाकाहाराचा पुरस्कार करतात. प्लांट बेस्ड मीट उत्पादनं खातात. त्यामुळेच त्यांनी ब्ल्यू ट्राईबमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. विराट आणि अनुष्का अनेक वर्षांपासून शाकाहारी आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते प्लांट बेस्ड मीट खातात.

ब्ल्यू ट्राईब वनस्पतीवर आधारित मांस उत्पादनांची निर्मिती करते. या मांसाची चव खऱ्याखुऱ्या मांसासारखी असते. मात्र त्यासाठी मटर, सोयाबीन, डाळ, धान्य आणि शाकाहारी साहित्यांचा वापर करण्यात येतो. वनस्पतीवर आधारित मांस खाल्ल्यानं शरीराला प्रथिने, व्हिटामिन आणि अन्य पोषक घटक मिळतात.

शाकाहारी पदार्थांच्या सहाय्यानं ब्ल्यू ट्राईब वनस्पतीवर आधारित मांस उत्पादनं तयार करते. संदीप सिंह आणि निक्की अरोरा सिंह यांनी या कंपनीची स्थापना केली. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनीदेखील अशाच प्रकारची कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनीदेखील वनस्पतीवर आधारित मांस उत्पादनांची निर्मिती करते.

 

VIRUSHKA:No-Non-Veg…No-Meat-Diet ! What is VEGAN DIET?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात