उत्तर प्रदेशात समाजवादी बंडखोर नितीन अग्रवाल विधानसभेच्या उपाध्यक्षपदी; भाजपची खेळी


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेची मुदत संपत असताना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने राजकीय चाल खेळत समाजवादी पक्षाचे बंडखोर उमेदवार नितीन अग्रवाल यांना पाठिंबा देत विधानसभेचे उपाध्यक्ष बनविले आहे. Uttar Pradesh, socialist rebel Nitin Agarwal as the Deputy Speaker of the Legislative Assembly; BJP’s game

विधानसभेची मुदत आता फक्त चार-पाच महिने उरली आहे. त्याच्याआधी भाजपने समाजवादी पक्षावर मात करण्यासाठी ही चाल खेळल्याचे मानण्यात येते. समाजवादी पक्षाने नरेंद्र वर्मा यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु नितीन अग्रवाल यांनी बंडखोरी केली. भाजपने त्यांना पाठिंबा दिला गुप्त मतदान झालेल्या निवडीत नितीन अग्रवाल यांना 304 मते मिळाली, तर नरेंद्र वर्मा यांना 60 मते मिळाली.



समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश विधानसभेत सध्या 50 आमदार आहेत. अर्थात या सर्वांनी नरेंद्र वर्मा यांनाच मतदान केल्याची खात्री नाही. त्यामुळे भाजप सुमारे 150 आमदारांची तिकिटे कापणार आहे, असा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा आपलाच पक्ष ठीकठाक राहतो की नाही याची चिंता भाजपने त्यांना करायला लावल्याची चिन्हे दिसली आहेत.

Uttar Pradesh, socialist rebel Nitin Agarwal as the Deputy Speaker of the Legislative Assembly; BJP’s game

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात