चीनी ड्रॅगनच्या विरोधात आता अमेरिका, ब्रिटनची थेट ऑस्ट्रेलियाला साथ


वृत्तसंस्था

बीजिंग : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लष्करी भागीदारीला चीनने कडाडून विरोध केला आहे. या भागीदारीअंतर्गत ऑस्ट्रेलियाला अण्वस्त्रवाहू पाणबुडी विकसीत करण्यासाठी मदत केली जाणार आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी भारत-प्रशांत महासागर क्षेत्रासाठी नवी सुरक्षा आघाडी स्थापन केली आहे. USA, Briton will back Australia against China

तिन्ही देशांमधील करारामुळे प्रादेशिक पातळीवरील स्थैर्याला धोका निर्माण झाला असून शस्त्रस्पर्धेला प्रोत्साहन मिळत आहे, अशी टीका चीनने केली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी भारत-प्रशांत महासागर क्षेत्रासाठी नवी सुरक्षा आघाडी स्थापन केली आहे.



२१ व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि संरक्षण क्षमतांचा विकास व देवाणघेवाण करण्यासाठी ही आघाडी स्थापन केली असल्याचे करारावेळी सांगण्यात आले. चीनच्या विस्तारवादाच्या धोरणाला आळा घालण्याचाही या कराराचा हेतू असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कराराद्वारे ऑस्ट्रेलियाला अण्वस्त्रवाहू पाणबुडी बांधण्यास अमेरिका आणि ब्रिटनचे सहकार्य मिळणार असल्याने चीनने चिंता व्यक्त केली आहे.

USA, Briton will back Australia against China

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात