US Pharma Study Shows 44 Hand sanitizers Containing Chemical Could Cause cancer

Alert : कोरोनापासून वाचवणाऱ्या सॅनिटायझरमुळेच होतोय कॅन्सर, 44 हँड सॅनिटायझर अत्यंत धोकादायक

Hand sanitizers : कोरोनापासून बचावासाठी अद्यापही मास्क आणि हँड सॅनिटायझर यांच्याच भरवशावर सर्वसामान्य आहेत. कोरोनाच्या काळात सॅनिटायझरने हात धुणे हे प्रत्येकाच्या अंगवळणी पडले आहे. परंतु याच सॅनिटायझरमुळे कॅन्सर होत असल्याचे संशोधन समोर आले आहे. आपण ज्या सॅनिटायझरचा वापर करतो, त्यापैकी 44 हँड सॅनिटायझरमध्ये कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या रसायनांचा वापर होत आहे. एका अभ्यासातून हे समोर आले आहे. US Pharma Study Shows 44 Hand sanitizers Containing Chemical Could Cause cancer


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनापासून बचावासाठी अद्यापही मास्क आणि हँड सॅनिटायझर यांच्याच भरवशावर सर्वसामान्य आहेत. कोरोनाच्या काळात सॅनिटायझरने हात धुणे हे प्रत्येकाच्या अंगवळणी पडले आहे. परंतु याच सॅनिटायझरमुळे कॅन्सर होत असल्याचे संशोधन समोर आले आहे. आपण ज्या सॅनिटायझरचा वापर करतो, त्यापैकी 44 हँड सॅनिटायझरमध्ये कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या रसायनांचा वापर होत आहे. एका अभ्यासातून हे समोर आले आहे.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना महामारीने पाहता पाहता अवघ्या जगाला कवेत घेतले. कोरोनावर लस आलेली असली तरी अद्याप ती तळागाळात पोहोचायची बाकी आहे. यामुळे तोपर्यंत मास्क, वारंवार हात धुणे, दो गज दुरी हाच सुरक्षिततेचा उपाय आहे.

व्हॅलेझरच्या अभ्यासातील निष्कर्ष

जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी जगभरात हँड सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. कोरोना रोखण्यासाठी रुग्णालयापासून ते घरापर्यंत प्रत्येक ठिकाणी आबालवृद्ध सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. परंतु काही विशिष्ट रासायनिक घटक असलेल्या सॅनिटायझरच्या दीर्घकाळ वापरामुळे तुम्हाला कर्करोग किंवा त्वचेचा विकार उद्भवू शकतो. अमेरिका स्थित ‘व्हॅलिझर’ या ऑनलाइन फार्मसीने 260 हून अधिक हँड सॅनिटायझर्सचा सविस्तर अभ्यास केला. व्हॅलेझरने याबाबत अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाला (एफडीए) एक पत्र लिहून माहिती दिली.

एफडीएला लिहिलेल्या पत्रात व्हॅलिझरने नमूद केले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हँड सॅनिटायझर्सची मागणी वाढली आहे. यादरम्यान न्यू हेव्हन येथील व्हॅलिझर या ऑनलाइन फार्मसीने अनेक ब्रँडमधील 260 हँड सेनिटाझयर्सचा अभ्यास केला आहे, यात 44 हून अधिक सॅनिटायझर्समध्ये बेन्झिनसह अनेक घातक रसायने आढळली आहेत.

काय आहे बेन्झिन?

बेन्झिन हे एक द्रव रासायन आहे, जे सहसा रंगहीन असते, परंतु कधीकधी ते सामान्य खोलीच्या तापमानावर पिवळे दिसते. बेन्झिनच्या जास्त संपर्कात आल्यास शरीरातील रक्तपेशी व्यवस्थित कार्य करत नाहीत. कधीकधी लाल रक्त पेशी तयार होणे थांबते किंवा पांढर्‍या रक्तपेशी कमी होऊ लागतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होत जाते. जागतिक आरोग्य संघटनेची आंतरराष्ट्रीय संस्था ‘रिसर्च ऑन कॅन्सर’ने बेन्झिनची कार्सिनोजेन म्हणून वर्गवारी केलेली आहे. कार्सिनोजेनला सर्वात जास्त जोखमीच्या ग्रुप -1 श्रेणीत ठेवण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर कर्करोगाला कारणीभूत असणारा घटक म्हणून कार्सिनोजनला ओळखले जाते. यामुळे बेन्झिनचा समावेश असलेल्या सॅनिटायझरचा वापर न करणेच चांगलेच.

US Pharma Study Shows 44 Hand sanitizers Containing Chemical Could Cause cancer

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*