मस्लिमांनी मथुरेतील मशीद हिंदूंना द्यावी, उत्तर प्रदेशचे मंत्री आनंद शुक्ला यांची मागणी


प्रतिनिधी

बलिया – मथुरेतील श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मंदिराशेजारची मशीद मुस्लिमांनी हिंदूंना सुपूर्द करावी, असे उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी म्हटले आहे. न्यायालयाने अयोध्येतील वाद सोडविला असताना वाराणसी, मथुरेतील मशिदी हिंदूंना दुखवत आहेत, असेही ते म्हणाले. UP ministers damands Mdhuta mosque

शुक्ला म्हणाले,की न्यायालयाच्या मदतीने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीशेजारी असलेली मशीद हटविण्याची वेळ आता आली आहे. राम आणि कृष्ण हेच आपले पूर्वज होते.

अकबर आणि औरंगजेब हे हल्लेखोर होते, यावर देशाच्या मुस्लिमांना विश्वास ठेवावाच लागेल, असे डॉ.राम मनोहर लोहिया म्हणाले होते. मुस्लिमांनी अकबर, औरंगजेबांनी बांधलेल्या कोणत्याही इमारतीशी स्वत:शी संबंध जोडू नये. मुस्लिम समुदायाने पुढाकार घेऊन मथुरेतील ही मशीद हिंदूंच्या ताब्यात द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.



देशातील सर्व मुस्लिमांचे धर्मांतर केले गेले. त्यामुळे, शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सईद वासिम रिझवींप्रमाणे मुस्लिमांनी हिंदू धर्मात घरवापसी करावी, असेही ते म्हणाले.

UP ministers damands Mdhuta mosque

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात