कचरा वेचकांची बँक खाती उघडून माय ग्रीन सोसायटीची दीपोत्सवानिमित्त अनोखी भेट; केंद्र सरकारचे लाभ घेणे शक्य


प्रतिनिधी

मुंबई :  शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचे विश्‍वच वेगळे असते. दोन वेळच्या भाकरीची सोय करण्यासाठी ही मंडळी जीव धोक्‍यात घालून कचराकुंडीत उतरतात. अशा कचरा वेचकांना एकत्रित आणून दिवाळी साजरी करण्यासाठी माय ग्रीन सोसायटी या संस्थेने पुढाकार घेतला आहे.Unique gift of My Green Society on the occasion of Dipotsavani by opening bank accounts of garbage collectors; It is possible to take advantage of the central government

२८ ते ३० ऑक्टोबर या तीन दिवसात या संस्थेने मुंबई शहर परिसरातील कचरा वेचकांना भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करुन एक अनोखा दीपोत्सव साजरा केला. याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांचा त्यांना लाभ घेता यावा तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे बँक खातेही सुरु करण्यात येणार आहे.



शहरात दिवाळी सणानिमित्त जय्यत तयारी सुरु आहे. मात्र हातावर पोट असलेल्या कचरा वेचकांना  दिवाळी पोटाला चिमटे काढून साजरी करावी लागते. कधी कधी दोन वेळचे जेवण नशिबी नसलेल्या या कचरा वेचकांना दिवाळीचे अप्रूप असूनही त्यांना परिस्थितीमुळे ती साजरी करता येत नाही.

अशा कचरा वेचकांसाठी माय ग्रीन सोसायटीच्यावतीने तीन दिवस दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बँकेत खाते तयार करण्यासाठी त्यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड तसेच पॅन कार्डचे तपशील घेण्यात आले असून लवकरच त्यांच्या नावाचे खाते बेँकेत सुरु होईल. त्यांच्या नावाची रितसर नोंदणी झाल्यामुळे केंद्र सरकारच्या निरानिराळ्या योजनांचा लाभ घेणे त्यांना शक्य होणार आहे.

Unique gift of My Green Society on the occasion of Dipotsavani by opening bank accounts of garbage collectors; It is possible to take advantage of the central government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात