Ukraine Indian students : “ऑपरेशन गंगा”मध्ये उतरवले हवाई दलाचे “सी 17” विमान!!; प्रवासी वाढणार, वेळ वाचणार!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन यांच्या दरम्यान सुरु असलेल्या घनघोर युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने मायदेशात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. मात्र एअर इंडियाच्या विमानातून तितक्या मोठ्या संख्येने भारतीयांना घेऊन येता येत नाही, त्यामुळे अखेर भारताने सक्षम हवाई दलाची मदत घेतली आहे.Ukraine Indian students


रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उत्तर कोरियाची खुमखुमी, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले, दक्षिण कोरियाने बोलावली तातडीची बैठक


एकाच वेळी जिथे 102 प्रवाशांना घेऊन येता येथे तिथे भारताने आता “सी 17” विमान या गंगा ऑपरेशनसाठी उतरवले आहे, ज्यामुळे एकाच वेळी 336 भारतीयांना भारतात घेऊन येत येणार आहे. या विमानामुळे एकाच वेळी अधिक संख्येने प्रवासी भारतात आणता येऊ शकतात. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बैठका घेत आहेत, त्यातच पंतप्रधान मोदी यांनी “ऑपरेशन गंगा”मध्ये “सी 17” विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. हे विमान एकाच फेरीत 10 हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.

Ukraine Indian students

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात