मोदी भारत इफेक्ट : अरबस्तानातील अल मिनहाद शहराचे नामांतर आता हिंद शहर!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात जरी लेफ्ट लिबरल गॅंग आणि आंतरराष्ट्रीय टूलकिट यांची भारताला बदनाम करण्याची कारस्थाने सुरू असली तरी जगभरात भारताचा आणि भारतीयांचा प्रभाव प्रचंड वाढत आहे. याचे दृश्य परिणाम समोर येत आहेत. UAE Vice President Rashid Al Maktoum renames Al Minhad District as Hind City

यातलाच एक परिणाम म्हणजे अरबस्तानातील म्हणजेच युनायटेड अरब अमिरातील अल मिनहाद शहराचे नामांतर आता हिंद शहर असे करण्यात आले आहे. दुबईचे सत्ताधीश युनायटेड अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांनी अल मिनहाद शहराचे नामांतर हिंद शहर असे करण्यास मान्यता दिली आहे. त्या सरकारी आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे.

या हिंद शहराचे चार भाग असतील हिंद 1, हिंद 2, हिंद 3, हिंद 4 असे चार भाग मिळून तब्बल 83.9 किलोमीटरचे हे हिंद महाशहर असेल.

युनायटेड अरब अमिरात आणि सौदी अरेबिया हे दोन्हीही देश भारत आणि पाकिस्तान या दोघांचेही निकटचे मित्र मानले जातात. पाकिस्तानचे राज्यकर्ते या दोन्ही देशांना स्वतःचे बंधू मानतात. पण आता या दोन्ही देशांनी पाकिस्तानला काश्मीरचा विषय विसरून जाऊन भारताबरोबर मैत्री करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला 29 जानेवारी 2023 रोजी दिला आहे. त्यानंतर अरबस्तानातील अल मिनहाद शहराचे नामांतर हिंद शहर असे करण्यात आले आहे. यामुळे आखातामध्ये भारतीयांचा प्रभाव ठळक झाला आहे.

UAE Vice President Rashid Al Maktoum renames Al Minhad District as Hind City

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात