मुस्लिम लिगच्या बड्या नेत्याला तृतीयपंथीयाने दिले आव्हान, केरळमध्ये निवडणुकीच्या रिंगणात


केरळमधील वेंगरा मतदारसंघातून लढत असलेले मुस्लिम लिगचे दिग्गज नेते पी. के. कुन्हाली कुट्टी यांना एका तृतीयपंथीयोन आव्हान दिले आहे.. अनन्या कुमारी एलेक्स या तृतीयपंथीय व्यक्तीला डेमोक्रॅकिट सोशल जस्टिस पाटीर्ने (डीएसजेपी) तिकीट दिले आहे. मुस्लिम लीगचा गड मानल्या जाणाऱ्या मालाप्पुरमच्या वेंगरा मतदारसंघातून त्या निवडणूक लढविणार आहे. Transgender challenges Muslim League leader in Kerala polls


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : केरळमधील वेंगरा मतदारसंघातून लढत असलेले मुस्लिम लिगचे दिग्गज नेते पी. के. कुन्हाली कुट्टी यांना एका तृतीयपंथीयोन आव्हान दिले आहे.. अनन्या कुमारी एलेक्स या तृतीयपंथीय व्यक्तीला डेमोक्रॅकिट सोशल जस्टिस पाटीर्ने (डीएसजेपी) तिकीट दिले आहे. मुस्लिम लीगचा गड मानल्या जाणाºया मालाप्पुरमच्या वेंगरा मतदारसंघातून त्या निवडणूक लढविणार आहे.

अनन्या केरळमधील एक प्रसिध्द व्यक्तीमत्व आहे. राज्यातील पहिले रेडिओ जॉकी बनून त्यांनी विक्रम केला होता. आता त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. वय केवळ २८ वर्षे आहे. एलेक्स म्हणाल्या, प्रचाराची पूर्वतयारी केली आहे. एक तृतीयपंथी या नात्याने मी लोकांना मत मागणार आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगले काम करून दाखवेल. माझ्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे वाटते. मी जिंकले तर सर्वांना समान वागणूक देणे ही मोठी जबाबदारी असेल. लिंग, जात-धर्माच्या आधारे वागवणार नाही. विजय झाल्यास महिला सुरक्षा, शिक्षण, अल्पसंख्याक त्यातही ट्रान्सजेंडर यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे.यूडीएफचे वेंगरातील उमेदवार कुट्टी २०११ व २०१६ मध्ये आमदार होते. २०१७ मध्ये मुस्लिम लीगचे अध्यक्ष ई अहमद यांच्या निधनानंतर मालाप्पुरम लोकसभा मतदारसंघातून ते पोटनिवडणुकीत उतरले आणि विजयी झाले. २०१९ मध्ये ते पुन्हा खासदार झाले. परंतु विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राजीनामा दिला. वेंगरात पुन्हा ते मैदानात आहेत. वेंगरामध्ये १.८२ मतदार आहेत. त्यापैकी सुमारे ७० टक्के मुस्लिम आहेत.
विजयन सरकारच्या कामाबाबत अनन्या म्हणाल्या, त्यांची काही कामे चांगली आहेत. काही चुुकीची. यंदा सरकार कोणाचे येईल? त्यावर जनता योग्य व्यक्तीची निवड करेल.

Transgender challenges Muslim League leader in Kerala polls

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी