सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांनी एकदा सेल्युलर जेलला भेट द्यावी, सगळे भ्रम दूर होतील, अमित शहा यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

अंदमान : कोणा एका व्यक्तीने नव्हे तर 131 कोटी भारतीयांनी त्यांची विरता आणि देशभक्तीमुळे स्वातंत्र्यवीर ही उपाधी दिली होती. दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सावरकरांसारख्या देशभक्ताच्या आयुष्यावर काही जण सवाल करत आहेत पाहून दुःख होते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.Those who doubt Savarkar’s patriotism should visit Cellular Jail once, all illusions will be removed, Amit Shah appeals

शहा यांनी आपल्या अंदमान दौऱ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जेथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या सेल्युलर जेलला भेट दिली.शहा म्हणाले, जे लोक वीर सावरकर यांच्या देशभक्तीवर प्रश्न करत आहेत त्यांनी एकदा येथे येऊन या तपोभूमीचे दर्शन घ्यावे.त्यांच्या मनातील सगळे भ्रम दूर होतील.



सावरकर यांना वीर ही उपाधी सरकारने नव्हे तर कोट्यवधी देशवासियांनी दिली होती.त्यांच्या नावासमोर वीर हा शब्द जोडला होता. तो मिटविणे कोणालाही शक्य नाही.
गृहमंत्री म्हणाले वीर सावरकर यांच्या त्यागाने सेल्युलर जेल हे तीर्थक्षेत्र बनले आहे.

कोणी कितीही यातना दिल्या तरी अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही असा संदेश जगाला दिला. मी जेव्हा जेव्हा येथे येतो येथून नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातो. स्वातंत्र्य आंदोलनातील या तपोवनी आल्यावर स्वातंत्र्यवीरांच्या वलीदान आणि संप्रकाला नमन करतो. देशातील लोकांसाठी इंग्रजांनी तयार केलेले हे सेल्युलर हेल खूप मोठे आहे.सावरकर म्हणायचे हे तीर्थांचे महातीर्थ आहे.स्वातंत्र्याची ज्योत येथेच प्रज्वलित झाली.

Those who doubt Savarkar’s patriotism should visit Cellular Jail once, all illusions will be removed, Amit Shah appeals

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात