ही खरी बातमी : केजरीवालांचा वारस शोधण्यासाठी दिल्लीत आम आदमी पार्टीची तातडीची बैठक!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होण्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा दिवसभर शक्तिप्रदर्शन आणि राजकीय गदारोळ झाल्यानंतर खरी बातमी बाहेर आली आहे, ती म्हणजे आम आदमी पार्टीची दिल्लीत तातडीची बैठक होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा राजकीय वारस शोधण्यासाठी ही बैठक होत आहे.This real news: Aam Aadmi Party emergency meeting in Delhi to find Kejriwal’s successor!!

आम आदमी पार्टीचे दिल्लीतले संयोजक गोपाल राय यांनी ही बैठक बोलावली असून त्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता, दिल्लीच्या महापौर शैली ओबेराय, उपमहापौर अली मोहम्मद इकबाल हे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. दारू घोटाळ्यात सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केली, तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजकीय पेजप्रसंग तयार होतो. तो सोडविण्यासाठी किंबहुना केजरीवालांचा राजकीय वारस ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.



याआधी दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्याआधी दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक होऊन ते तिहार तुरुंगात गेले, तेव्हा फार मोठा राजकीय पेचप्रसंग तयार झाला नव्हता. त्यावेळी अरविंद केजरीवालांनी त्या दोन्ही मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामाही घेतला नव्हता. पण त्यांना वारंवार जामीन नाकारल्यानंतर या दोन्ही नेत्यांचा राजीनामा घेणे केजरीवाल्यांना भाग पडले होते. आता दारू घोटाळ्यात दस्तूर खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीच सीबीआय चौकशी या प्रकरणात सुरू झाली आहे. त्यांना या चौकशीनंतर सीबीआयने अटक केली, तर ते दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री पदावर राहू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचा राजकीय वारस शोधणे आम आदमी पार्टीला भाग आहे. म्हणूनच त्याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी पक्षाचे संयोजक गोपाल राय यांनी तातडीची बैठक बोलवून त्यामध्ये आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनाही सामील करून घेतले आहे. या बैठकीतू नेमके काय निष्पन्न होते, हे थोड्या वेळात समजण्याची शक्यता आहे.

केजरीवाल यांनी सीबीआय कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी आपण जिंकणार असल्याचे मोठमोठे दावे केले होते. आम आदमी पार्टीनेही दिवसभर दिल्लीमध्ये मोठे राजकीय शक्तिप्रदर्शन केले होते. परंतु आता सीबीआयची कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर मात्र जमिनीस्तरावर येऊन आम आदमी पार्टीला मुख्यमंत्रीपदासाठी अरविंद केजरीवाल यांचा राजकीय वारस शोधण्याची आवश्यकता तयार झाली आहे. त्यातूनच बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. गोपाल राय यांनी बोलविलेली तातडीची बैठक हा दिल्लीतल्या खऱ्या राजकीय नाट्याचा पहिला अंक आहे!!

This real news: Aam Aadmi Party emergency meeting in Delhi to find Kejriwal’s successor!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात