ममतांचे सोनिया, तेजस्वी, पवार, उध्दव यांना पत्र हे बुडणाऱ्या जहाजाला वाचविण्याचा प्रयत्न; जे. पी. नड्डा यांचे टीकास्त्र

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधी पक्षातील सोनिया गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे, तेजस्वी यादव आदी नेत्यांना लिहिलेले पत्र हे आपल्या बुडत्या जहाजाला वाचविण्याचाच एक प्रयत्न आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. There’s a saying in English,’Save our souls or Save our ship’. Mamata Ji has accepted her ship is sinking,it’s an effort to save it

ममतांनी सर्व विरोधी नेत्यांना भाजपच्या विरोधात एकजुटीचे आवाहन करणारे पत्र लिहिल्याची बातमी दुपारी आली त्यानंतर त्याची सायंकाळी दखल घेऊन नड्डा यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. नड्डा म्हणाले, की ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. लोकशाहीत कोणत्याही पक्षांना एकत्र येण्याचा अधिकार जरूर आहे. पण जेव्हा बंगालमधली निवडणूक ऐन मध्यावर आहे, ते टायमिंग साधून ममतांनी पत्र लिहिणे हे त्यांचे जहाज निवडणूकीत बुडणार असल्याची त्यांच्या मनातली भीती दाखवित आहे.पश्चिम बंगालच्या निवडणूकीतली तृणमूळ काँग्रेसची हार त्यांना दिसते आहे. भाजपचा एकतर्फी विजय तेथे होणार आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘Save our souls or Save our ship’ म्हणजे आम्हाला वाचवायला या. आमचे बुडते जहाज वाचवायला या… याचा अर्थ जहाज बुडते आहे, आता बाहेरच्या लोकांनी येऊन आम्हाला वाचवावे म्हणजे आमचा पक्षाला पराभवापासून वाचवावे, असा ममतांच्या पत्राचा खरा अर्थ आहे, अशी टीका नड्डा यांनी केली. ममतांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच आपला पराभव मान्य केल्याचे हे पत्र निदर्शक आहे, असेही त्यांनी सांगितले.

There’s a saying in English,’Save our souls or Save our ship’. Mamata Ji has accepted her ship is sinking,it’s an effort to save it

काही बातम्या

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मूळाशी मेळघाटातील अवैध धंदे; प्रकाश आंबेडकरांचा आरोप; महाराष्ट्रात सरकार वाघांचे की लांडग्यांचे??

कर्नाटकात मुख्यमंत्री येडीयुरप्पांविरोधात खदखद; ग्रामविकासमंत्री ईश्वरप्पांचे राज्यपालांना पत्र; मुख्यमंत्री अधिकारशाही गाजवत आहेत!!

कृषी कायद्यांवरील सुप्रीम कोर्टाच्या समितीने अहवाल केला सादर, लवकरच सुनावणी होऊन निर्णयाची शक्यता

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*