देशात घाईत लॉकडाऊन लावला जाणार नाही, कारण तशी परिस्थिती दिसत नाही, अमित शहा यांनी केले स्पष्ट


देशात घाईत लॉकडाऊन लावला जाणार नसून सध्या अशी परिस्थिती दिसत नाही असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली आहे.There will be no hasty lockdown in the country, as the situation does not look like that, Amit Shah clarified


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात घाईत लॉकडाऊन लावला जाणार नसून सध्या अशी परिस्थिती दिसत नाही असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली आहे.एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाह यांनी म्हटले आहे की,

आम्ही स्टेकहोल्डर्ससोबत चर्चा करत होते. सुरूवातीला लॉकडाऊन संदर्भातला उद्देश हा निराळा होता. आम्हाला पायाभूत सुविधा आणि उपचाराशी रुपरेषा तयार करायची होती. तेव्हा आमच्याकडे कोणतंही औषध किंवा लस नव्हती. परंतु आता परिस्थिती निराळी आहे.



तरीही आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत. जो काही एकमतानं निर्णय होईल त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. परंतु सध्या घाईनं लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती दिसत नाही.कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी बरेच उपक्रम सुरू झाले होते.

आणीबाणीच्या गोष्टी आता का नाहीत या प्रश्नावर शाह म्हणाले, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दोन बैठका झाल्या आणि त्यावेळी मीही हजर होतो. नुकतीच सर्व राज्याच्या राज्यपालांसोबतही बैठक पार पडली. सर्व सरकारांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील भागधारकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आमची बैठक झाली आहे.

लसीकरणाबाबत आमची वैज्ञानिकांशी चर्चा झाली आहे आणि प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्यासाठीही एक बैठक झाली आहे. यासोबत लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. यावेळी कोरोनाच्या प्रसाराची गती इतकी अधिक आहे की ही लढाई थोडी कठीण आहे. परंतु यावर आपण नक्की विजय मिळवू.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल सर्वजण चिंताग्रस्त आहेत. मलाही त्याची चिंता आहे, असे सांगून शहा म्हणाले, आपले वैज्ञानिक यासोबत लढण्यासाठी काम करत आहेत. आपण नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं वाटतंय.

अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. वैज्ञानिक यावर अभ्यास करत आहेत आणि यावर वेळेपूर्वीच निष्कर्ष काढला जाईल.महाराष्ट्रात निवडणुका आहेक का? त्या ठिकाणी ६० हजार रुग्णांची नोंद होत आहे. पश्चिम बंगालमध्ये हिच संख्या ४ हजार आहे.

महाराष्ट्रासाठीही मला सहानुभूती आहे आणि पश्चिम बंगालसाठीही. याला निवडणुकांसोबत जोडणं योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे.

There will be no hasty lockdown in the country, as the situation does not look like that, Amit Shah clarified

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात