माजी आमदार पी. सी. जॉर्ज यांच्या समर्थनासाठी केरळमध्ये संघ परिवार आणि ख्रिश्चन समुदाय एकत्र


केरळमध्ये माजी आमदार पी. सी. जॉर्ज यांनी मुस्लिम समाजाला सुनावल्यावर त्यांना अटक झाली आहे. मात्र, त्यामुळे संघ परिवार आणि ख्रिश्चन समुदाय एकत्र आला असून नव्या राजकारणाची समीकरणे जुळू लागली आहेत. The Sangh Parivar and the Christian community came together in Kerala in support of P.C. George


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये माजी आमदार पी. सी. जॉर्ज यांनी मुस्लिम समाजाला सुनावल्यावर त्यांना अटक झाली आहे. मात्र, त्यामुळे संघ परिवार आणि ख्रिश्चन समुदाय एकत्र आला असून नव्या राजकारणाची समीकरणे जुळू लागली आहेत.

मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी जॉर्ज यांना अटक करणयत आली होती. सत्ताधारी कम्युनिस्ट, विरोधी पक्ष असलेला कॉँग्रेस आणि मुस्लिम संघटनांनी जॉर्ज यांचा निषेध केला आहे. मात्र, संघ परिवार आणि ख्रिश्चन समुदाय त्यांना पाठिंबा देत आहे. पोलीसांची ही कारवाई म्हणजे कम्युनिस्टांचे डबल स्टॅँडर्ड दर्शविणारी आहे, अशी टीका केली जात आहे.

कॅथोलिक काँग्रेसने म्हटले आहे की जॉर्ज यांच्या विरुद्ध कारवाई करून, सरकारला अतिरेकी गटांना शांत करायचे आहे. ख्रिश्चन असोसिएशन आणि अलायन्स फॉर सोशल यांनी भाजपाच्या आरोपांचे समर्थन केले आहे. केरळमधील बिशपांचे थेट नियंत्रण असलेल्या कॅथोलिक काँग्रेसदे ख्रिश्चनांची श्रद्धास्थाने आणि देवांचा अपमान करूनही सरकार विशिष्ठ समाजाच्या लोकांविरुध्द कारवाई करत नाही, असे म्हटले आहे.

आता, सरकार जॉर्जला दिलेल्या जामीनाविरुद्ध अपील करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे संघ परिवार आणि जॉर्ज यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी संताप व्यकत केला आहे. कॅथोलिक काँग्रेसने विरोधी पक्षनेते व्ही डी साठेसन यांच्या जॉर्जवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीवर टीका केली आहे. कॉँग्रेस व्होट बँकेच्या दबावामुळे या प्रकरणात एकाचीच बाजू घषत आहे असे म्हटले आहे. जॉर्ज यांच्या अटकेच्या विरोधात तिरुअनंतपुरम येथे काढण्यात आलेल्या मोर्चात हिंदू संघटनांसोबतच ख्रिश्चन संघटनाही सहभागी झाल्या होत्या. संघ परिवाराने जॉर्ज यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचा मूळ जिल्हा कोट्टायम येथ सभेचे आयोजन केले होते.

जॉर्ज हे सहा वेळा आमदार राहिले आहेत. 2016 मध्ये पुंजारमधून अपक्ष म्हणून त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, २०२१ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

The Sangh Parivar and the Christian community came together in Kerala in support of P.C. George

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात