कट्टर मुस्लिमांच्या रॅलीत हिंसाचार, पाकिस्तानात चार बळी


तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टर मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाहोर ते इस्लामाबाद यात्रा काढली आहे. या दरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा बळी गेला आहे. The radical Islamists — Tehreek-i-Labbaik Pakistan had launched a rally from Lahore to Islamabad demanding Pak government release their leader Saad Rizvi.


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : टीएलपी या धर्मवेड्या मुस्लिम संघटनेचा नेता साद रिझवी याला मुक्त करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात झालेल्या हिंसाचारामुळे चौघांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी सुरक्षा दल आणि मोर्चेकऱ्यांमध्ये हिंसाचार झाला. यात दोन पोलिस आणि अन्य पंधरा जण गंभीर जखमीही झाले असे पोलिसांनी सांगितले.

तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टर मुस्लिम संघटनेने लाहोरपासून इस्लामाबादपर्यंत यात्रा सुरु केली आहे. गेल्यावर्षी फ्रेंच मासिकाने मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधात काही चित्रे प्रसिद्ध केली होती. त्याचा निषेधार्थ आणि पाकिस्तानातील फ्रेंच राजदुताची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी रिझवीने गेल्या वर्षी आंदोलन केले होते. त्यावेळी त्याला अटक झाली.

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी टीएलपीच्या मोर्चाला इस्लामाबादला जाण्यापासून रोेखण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोर्चेकऱ्यांवर अश्रुधुराच्या तब्बल अडीच हजार नळकांड्या फोडण्यात आल्या. त्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रतिकार सुरु केला आणि हिंसाचार उफाळला.

पाकिस्तानी पंजाब पोलिसांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की मोर्चेकऱ्यांना अडवण्यासाठी अश्रुधुराच्या अडीच हजारांहून अधिक नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यांना इस्लामाबादला जाण्यापासून रोखण्याचा आमचा प्रयत्न होता. यावेळी झालेल्या संघर्षात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या अन्य पंधरा जणही गंभीर अवस्थेत आहेत. दरम्यान, टीएलपीनेही पोलिसांबरोबरच्या चकमकीत त्यांच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचे फोटो व्हायरल केले आहेत.

शुक्रवार संध्याकाळपासून लाहोर परिसरात प्रचंड तणाव आहे. लाहोरशी अन्य पाकिस्तानशी असणारा संपर्क पूर्णपणे तोडण्यात आला आहे. लाहोरकडे येणाऱ्या आणि लाहोरमधून बाहेर पडणाऱ्या सर्व रस्त्यांवर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी अडथळे उभारले आहेत. लाहोर परिसरातली मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. टीएलपी कार्यकर्त्यांनी लाहोरमधील त्यांच्या मुख्यालयापाशी धरणे आंदोलन चालू केले आहे. रिझवीची मुक्तता करा आणि फ्रेंच राजदुताला परत पाठवा अशी मागणी त्यांनी पाकिस्तान सरकारकडे लावून धरली आहे.

पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की या मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी सात हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. “लाहोर कडे येणारे आणि बाहेर जाणारे सर्व रस्ते कंटेनर ठेवून अडवले असल्याने टीएलपी कार्यकर्ते ते पार करु शकणार नाहीत. सोबतच टीएलपीच्या कार्यकर्त्यांची धरपकडही चालू केली आहे. पंजाब प्रांतातून आत्तापर्यंत दीड हजार कार्यकर्त्यांना अटक केली आहे,” असे त्यांनी सांगितले. अटक केलेल्या टीएलपी कार्यकर्त्यांवर दहशतवाद, अपहरण, गुंडगिरी, रस्ते अडवणे असे गुन्हे लावण्यात आले आहेत.

टीएलपी नेता पीर अजमल कादरी याने आधी शांततापूर्ण मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. शुक्रवारच्या नमाजानंतर मोर्चा सुरु होईल असे त्याने म्हटले होते. सरकारने आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडे दुसरा पर्यायही तयार आहे. आमची चळवळ प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आहे, असे त्याने म्हटले होते.

The radical Islamists — Tehreek-i-Labbaik Pakistan had launched a rally from Lahore to Islamabad demanding Pak government release their leader Saad Rizvi.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात