राष्ट्रीय पुरस्काराचे नाव जनतेच्या विनंतीमुळे नाही तर मोदींजींच्या एका ट्विटमुळे बदलले! राजीव गांधी खेलरत्न पारितोषिकाचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पारितोषिक करण्यात आले…


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : ऑगस्टमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले होते. यानंतर नरेंद्र मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड चे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड करण्याचे ठरविले होते. या निर्णयावर अंमलबजावणी झाल्या नंतर काँग्रेसचे सर्वात मोठे नेते यांचा अपमान केला गेला असे काही लोकांचे मत होते तर काही लोकांच्या मतानुसार ध्यानचंद यांची कामगिरी लक्षात घेता बदललेले नाव हे अतिशय योग्य होते.

The name of the national award was changed due to a tweet from Modi! The name of Rajiv Gandhi Khel Ratna Award was changed to Major Dhyanchand Khel Ratna Award …

तर सध्या राजीव गांधी खेलरत्न पारितोषिकाचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पारितोषिक असे करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदीजींनी ६ ऑगस्ट रोजी केलेल्या ट्वीटद्वारे सांगितले होते, पब्लिक डिमांडनुसार संबंधित पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे.

द वायर या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार , मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अॅन्ड स्पोर्ट्स ही गोष्ट सिद्ध करण्यात असफल ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही कागदपत्रे मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स कडून देण्यात आलेली नाहीयेत.


सुशीलकुमार मोदींना वेगळी जबाबदारी?; खुद्द मोदींच्याच ट्विटमुळे चर्चेला उधाण


मंत्रालयाने मोदींच्या ट्वीटनंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. आता मंत्रालयाने देखील अधिकृतपणे हे मान्य केले आहे की, पुरस्काराचे नाव बदलण्यासाठी लोकांकडून विनंती करण्यासंबंधित कोणतीही कागदपत्रे नाहीयेत.

8 ऑगस्ट २०२१ रोजी, द वायर या वृत्तवाहिनीने आरटीईअंतर्गत पीएमओकडून पुरस्कारासाठी नाव बदलण्यासाठी असे किती विनंती अर्ज प्राप्त झाले आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मंत्रालयातील सचिव आणि केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी शांता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही असे ते म्हणाले आहेत.

हे नाव चेंज करण्याआधी मंत्रालयाने संबंधित अधिकाऱ्यांशी देखील सल्लामसलत केली नाही. फक्त पंतप्रधानांच्या ट्वीटच्या आधारे पुरस्काराचे नाव बदलले गेले होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ट्विट आधी आले आणि लगेचच पुरस्काराचे अधिकृत नामांतर झाले.

The name of the national award was changed due to a tweet from Modi! The name of Rajiv Gandhi Khel Ratna Award was changed to Major Dhyanchand Khel Ratna Award …

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात