मेरे वतन आबाद रहे तू ! लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याला मिळाली नाही बाजारपेठ ; भारतीय सेनेने बर्बाद शेतकर्याला केले आबाद ; खरेदी केला सर्व माल;सलाम भारतीय सेना !


भारतीय लष्कराच्या सैनिकांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की ते केवळ सीमेवर उभे राहून आपल्या नागरिकांचे रक्षण करत नाहीत तर आर्थिक अडचणीत सापडल्यास त्या देशातील कोणत्याही नागरिकाचे संरक्षण करण्यास नेहमीच तयार असतात. 


भारतीय लष्कराची ही उदारता झारखंडमध्ये दिसून आली , जेथे एक शेतकरी आपले पीक विकू शकला नाही म्हणून लाखोंचा तोटा सहन करणार होता, परंतु भारतीय लष्कराच्या रेजिमेंटने हे होऊ दिले नाही. 


झारखंडच्या रंजन कुमार माहतोच्या शेतातील कलिंगड सिख रेजीमेंटने घेतले विकत.  The Indian Army settled the ruined farmer; All goods purchased; salute Indian Army!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : यंदा शेतकर्‍यांना कोरोना साथीचा आणि निसर्गाचा दुहेरी फटका बसला आहे. एकीकडे जेथे लॉकडाऊनमुळे शेतकरी आपले पीक घेऊन बाजारात जाऊ शकत नाहीत किंवा व्यापारी देखील पोहोचू शकत नाहीत. दुसरीकडे, मे मध्ये आलेल्या ‘यास’ चक्रीवादळाने शेतातले तयार पीक उध्वस्त केले.असेच काहीसे घडले हरियाणा येथील गावात . झारखंडमधील रामगड भागात २५ वर्षीय शेतकरी रंजन कुमार माहतोलाही अशाच अडचणींचा सामना करावा लागला. लॉकडाउनमुळे शेतातली कलिंगड विकण्यासाठी अडचण येत असल्यामुळे रंजनने हा सर्व माल भारतीय सैन्याला देण्याचं ठरवलं.



रंजनच्या या अडचणीबद्दल स्थानिक शीख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांना समजलं. यानंतर भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे आज सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. शिख रेजिमेंटने रंजन कुमार माहतोच्या शेतातली ५ टन कलिंगड बाजारभावाप्रमाणे विकत घेतली आहेत. झारखंडमधील शीख रेजिमेंटचे स्थानिक अधिकारी ब्रिगेडीअर एम. श्री कुमार यांनी रंजन कुमारच्या शेतात जाऊन त्याला या कलिंगडांचे पैसे देऊन हा सर्व माल विकत घेतला. भारतीय सैन्याच्या या कृतीमुळे रंजन कुमार निशब्द झाला.

रांची विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलेल्या रंजनने शेती करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी शिख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी रंजनच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांसाठी धान्य, खाण्याची पाकीट आणि काही भेटवस्तूही दिल्या.

रंजनने २५ एकर शेत जमीन भाड्यावर कसण्यासाठी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याला लॉकडाउन आणि चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे सातत्याने नुकसान होत आहे. त्यामुळे या तरुणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्याच्या शेतातली ५ टन कलिंगड विकत घेण्याचं ठरवलं अशी माहिती स्थानिक शिख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

रंजनच्या शेतात सध्या ४० शेतमजूर काम करत असून कलिंगडाव्यतिरीक्त त्याने भोपळी मिरची, वांगं आणि इतर भाजीपाल्याचीही लागवड केली आहे.

The Indian Army settled the ruined farmer; All goods purchased; salute Indian Army!

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात