फरीदाबादमधल्या निकिता तोमर लव्ह जिहाद हत्याकांडाचा चार महिन्यांत निकाल; खुनी तौसिफ, रेहानला न्यायलायने ठरविले दोषी; शुक्रवारी ठोठावणार शिक्षा

वृत्तसंस्था

चंडीगड – फरीदाबादच्या निकिता तोमर लव्ह जिहाद हत्या प्रकऱणातील मुख्य आरोपी तौसिफ आणि त्याचा सहकारी रेहान यांना स्थानिक कोर्टाने दोषी ठरवले असून शुक्रवारी त्यांच्या शिक्षेसंदर्भात युक्तीवादानंतर शिक्षा सुनावण्यात येईल. कोर्टाने चार महिन्यांत या केसचा निकाल दिला आहे. Tausif and his friend Rehan convicted for murdering #NikitaTomar. Quantam of sentence on 26 March.

हरियाणाच्या फरीदाबादमधील २१ वर्षीय निकिता तोमरची तौसिफने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवसाढवळ्या भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली होती. १ डिसेंबरपासून या प्रकरणी खटल्याची सुनावणी सुरू होती. यानंतर चार महिन्यांनी फरिदाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज आरोपींना दोषी ठरविले आहे.तौसिफ आणि रेहान यांनी निकीताच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा निकिताने त्याला ठामपणे विरोध केला तेव्हा तौसिफने पिस्तुल काढून तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पकडला गेला होता. अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर तौसिफने हत्या केली. त्यावेळी रेहान त्याच्या सोबत होता.

निकीतावर आपले प्रेम होते. पण दुसऱ्याशी लग्न करणार असल्याने हत्या केल्याचे तौसिफने पोलिसांना सांगितले होते. निकिताच्या कुटुंबाने २०१८ मध्ये दाखल केलेल्या केसमुळे आपले करिअर उद्ध्वस्त झाल्याचा दावाही तौसिफने केला होता. अटक झाल्याने मी मेडिसिनचा अभ्यास करू शकलो नाही. यामुळे मी बदला घेतला, असे तौसिफने पोलिसांना तपासात सांगितले होते.

हत्येनंतर एसआयटीने तपास हाती घेतला होता. तौसिफ निकीताला लग्नासाठी जबरदस्ती करत होता. यात त्याला त्याच्या कुटुंबाचाही पाठिंबा होता. असा आरोप निकीताच्या कुटुंबाने केल्याने पोलिसांनी लव्ह जिहादच्या अँगलने या प्रकरणाचा तपास केला होता.

पोलिसांनी कोर्टात ५५ साक्षीदार न्यायालयात पेश केले. सीसीटीव्ही फुटेजबरोबर फॉरेन्सिक रिपोर्ट, तौसिफ ज्या कारमधून आला होता, त्या कारमध्ये त्याचे केस आढळले. रेहानचे फिंगरप्रिंट कारमध्ये आढळले.

सीसीटीव्हीचे फुटेज स्पष्ट होते. त्यात तौसिफ हा रेहानशी भांडताना तसेच अतिशय जवळून निकीताच्या डोक्यात गोळी झाडताना दिसतो आहे. हे सगळे पुरावे पोलिसांनी कोर्टात सादर केले. तौसिफ आणि रेहान यांचे कबूलीनामेही या पुराव्यांबरोबर जोडले.

Tausif and his friend Rehan convicted for murdering #NikitaTomar. Quantam of sentence on 26 March.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*