उमेदवारांनी चक्क धुतले कपडे, मतदारांना बनवून दिला डोसा, तमिळनाडूत नमुनेदार प्रचाराने अनोखी रंगत

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार काय करतील याचा नेम नसतो. आता हेच पहा ना तमिळनाडूत एका उमेदवाराने चक्क महिलेचे कपडे धुतले तर दुसऱ्याने डोसे तयार करून मतदाराला खाऊ घातले.Tamilnadu shows different type campaign

तमिळनाडू नेहमीच प्रचाराच्या वेगवेगळ्या क्लृपत्यांसाठी ओळखला जातो. आता काही जण प्रचारासाठी रोबोचा वापर करत आहे तर कोणी पक्षाच्या निवडणूक चिन्हाप्रमाणे कटिंग करत आहेत. नागापटिन्नम विधानसभा मतदारसंघात मात्र प्रचाराचा अनोखा नमुना पाहावयास मिळाला.अण्णाद्रमुकचे नेते थांगा काथिरावन यांनी प्रचारफेरीदरम्यान एका महिलेचे कपडे धुतले. काथिरावन हे प्रचाराला निघाले असता त्यांनी एका महिलेला कपडे आणि भांडी घासताना पाहिले. ते पाहून काथिरावन हे स्वत:ला रोखू शकले नाही आणि त्या महिलेकडून कपडे घेतले आणि धुतले.

निवडून आल्यानंतर नागरिकांना वॉशिंग मशिन देणार असल्याचे जाहीर केले. तसेच त्या महिलेचे काही भांडी देखील घासली. अण्णाद्रमुकचे सरकार आल्यास महिलांना आणि गृहिणींना हाताने कपडे धुण्याची वेळ येणार नाही, असे काथिरावन म्हणाले.

वीरुम्भंक्कम मतदारसंघातील द्रमुकचे उमेदवार प्रभाकर राजा यांनी डोसे तयार केले आणि लोकांना खाऊ घातले. प्रभाकर राजा हे प्रचार फेरी करत असताना रस्त्यालगत असलेल्या एका डोसा गाडीजवळ थांबले. तेथे मालकाला बाजूला केले आणि स्वत:च डोसे तयार करून उपस्थितांना खाऊ घातले. मात्र ते लोकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास विसरले नाहीत.

Tamilnadu shows different type campaign

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*