तमिळनाडूच्या प्रचारात उतरले चक्क सर्वेच लाडके एमजीआर अर्थात एम. जी. रामचंद्रन, हुबेहूब अदांमुळे मतदार खूष

विशेष प्रतिनिधी

रामेश्वरम – तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांचे उमेदवार अनोखे मार्ग अवलंबत असल्याने तमिळनाडूतील प्रचारात वेगळीच रंगत प्राप्त झाली आहे. Tamilnadu Election campaign is in nice mood

तमिळनाडू म्हटले की जयललिता व करुणानिधी या दोघांभोवतीच निवडणूक फिरत असे. मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रथमच हे नेते नसल्याने निवडणुकीला खरा चेहरा मिळालेला नाही. त्यामुळे उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवित आहेत. नुकत्याच एका उमेदवाराने प्रचारावेळी चक्क कपडे धुतले तर एकाने डोसा बनवून मतदारांना खिलवला. या दोन्ही उमेदवारांनी सोशल मिडीयावर धूम उडवून दिली. आता असाच एक अपक्ष उमेदवार वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.मतदारांना प्रभावित करण्यासाठी एएमएमके (अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम) पक्षाचे उमेदवार जी. मुनीयासामी यांनी आगळी शक्कल लढविली आहे. अण्णाद्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्यासारखी वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यासह ते प्रचार करीत आहे. हा कार्यकर्ता दिसतो रामचंद्रन यांच्यासारखा. त्याचप्रमाणे बोलतोही अगदी तसाच. त्यामुळे त्याची अगदी छोटी छोटी भाषणे ऐकण्यास गर्दी होत आहे.

एमजीआर यांच्या हुबेहूब अदा सादर करीत हा कार्यकर्ता मतदारांची मने जिंकत आहे. वास्तविक एएमएमके पक्षाची युती असादुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर आहे. मुनीयासामी यांनी बसस्थानकावर प्रचार फेरी काढली तेव्हा या कार्यकर्त्यानेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

Tamilnadu Election campaign is in nice mood

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*