Tamil Nadu Assembly Election 2021 Results Live : ‘हे’ आहेत तमिळनाडूच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारे मुद्दे… स्टॅलिनच्या रूपाने ‘सन राइज’ जवळपास नक्की?


विशेष प्रतिनिधी

द्रविड अस्मिता: द्रविड अस्मिता त्यांच्यासाठी सर्वतोपरी आहे. तसं बघितलं तर तामिळी जनतेने दोन्ही द्रविड पक्षांना बर्‍यापैकी आलटून पालटून सत्ता दिली आहे. अपवाद एमजीआर आणि जयललिता ह्यांचा. ह्या दोघांनाही तामिळ जनतेने सलग दोनदा मुख्यमंत्रिपदावर बसवलं. हे भाग्य तर कलाईग्नारच्याही नशिबात नव्हतं!! पण इतकं होऊनही दोन द्रविड पक्षांमधील रस्सीखेच कधीही संपली नाही. Tamil Nadu Assembly Election 2021 Results Live

2021च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष रिंगणात आहेत, पण त्यांच्या त्यांच्या राजकीय गॉडफादरशिवाय!! त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी आणि त्यांच्या सध्याच्या राजकीय नेतृत्वासाठी ही लढाई लिटमस्ट टेस्ट आहे. एक मात्र नक्की – निकाल काहीही लागो, हरणारा राजकीय पक्ष फुटणार हे नक्की!! त्याचमुळे मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन (एम.के. स्टॅलिन) असो वा दुसर्‍या टोकावरील एडप्पडी के. पळनीस्वामी (इकेपी) आणि ओट्टाकरथेवर पनीरसेल्वम (ओकेपी) ह्यांचं राजकीय भविष्य ह्या निकालावर अवलंबून असेल. जो हरेल त्याची त्यांच्या त्यांच्या पक्षावरील पकड सुटणार, हे नक्की.



हिंदी विरुद्ध तमिळ : तामिळनाडूच्या निवडणुकीत हिंदी विरुद्ध तमिळ हा मुद्दाही गाजू शकतो. हिंदीमध्ये शिक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आला होता. त्याला सर्वात मोठा विरोध तामिळनाडूतून झाला होता. सरकारच्या या निर्णयाला तामिळनाडूचे राजकारणी आणि अभिनेत्यांनीही विरोध केला होता. त्यामुळे विरोधकांकडून हिंदीचा मुद्दा उचलून भाजप आणि सत्ताधारी एआयएडीएमकेची कोंडी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फायदा स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमकेलाच फायदा होऊ शकतो, असं राजकीय जाणकार सांगतात

गोहत्येचा मुद्दा: भाजपने एआयएडीएमकेसोबत युती केली आहे. युतीत भाजपच्या वाट्याला 20 जागा आल्या आहेत. भाजपने तामिळनाडूतील जाहीरनाम्यातून राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच रेस्क्यू करण्यात आलेल्या गायींना मंदिरांकडून चालविल्या जाणाऱ्या गोशाळेमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

स्टॅलिन फॅक्टर: करुनानिधी यांच्या निधनानंतर डीएमकेची सर्व धुरा स्टालिन यांच्याकडे आली आहे. स्टालिन हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2019च्या निवडणुकीत आक्रमक प्रचार करत 39 पैकी 37 जागांवर उमेदवार निवडून आणले आहेत. तर सत्ताधारी एआयएडीएमकेला केवळ एकच खासदार निवडून आणता आला आहे. या उलट 2014च्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने 37 जागा जिंकल्या होत्या. तर भाजप आणि पीएमकेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली होती. मात्र 2019च्या निवडणुकीत स्टालिन यांनी संपूर्ण चित्रं बदललं होतं. त्यामुळे स्टालिन विधानसभा निवडणुकीतही हीच कामगिरी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कमल हसनचा प्रवेश : मक्कल नीधि मैय्यम (Makkal Needhi Maiam) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये दंड थोपटले आहेत. त्यांनी विधासभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून लढणार याची घोषणा केलीय. ते तामिळनाडूतील दक्षिण कोईंबतुर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्यामुळे मतविभाजन होऊनफायदा तोटा कुणाला होणार हे कळेल. कमल हसन हे डाव्या विचारांचे आहेत. त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली होती.

अभिनेते, निर्माते विजयकांत : यांच्यापक्षाकडेही डोळेझाक करून चालणार नाही. विजयकांत यांनी देसीय मुरपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) नावाचा पक्ष स्थापन केला आहे. 2011मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 29 जागा जिंकल्या आहेत. सध्या ते त्यांच्या पक्षाचे महासचिव आणि आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निडणुकीत ते काय करिश्मा करतात यावरही बरंच अवलंबून असणार आहे.

महिला वर्गाची साथ कुणाला?: स्त्रीवर्ग कुठल्या दिशेने महत्वाचे- अम्मांच्या निधनानंतर आलेल्या वादळात पळनीस्वामी आणि पनीरसेल्वम ह्या जोडगोळीने गेल्या 4 वर्षांत सत्ता आणि पक्ष बर्‍यापैकी एकसंध ठेवला. पनीरसेल्वम ह्यांच्यासारख्या थेवर समाजाचा नेता, त्यामुळे बांधून ठेवलेली व्होट बँक आणि गौंडेर समाजाचे मुख्यमंत्री पळनीस्वामी ह्यांनी तामिळनाडूतल्या 15% जनसंख्या असलेल्या वन्नीयर समाजाला दिलेलं आरक्षण (त्याचीही गत महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणासारखीच झालीय) हे ह्या जोडगोळीचे ह्या निवडणुकीतले अ‍ॅसेट्स आहेत. सलग दोन टर्ममध्ये सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुकविरुद्ध अगदी अँटीइन्कबन्सी म्हणावी तशी नाराजीही नाही. तरीही फक्त द्रविड अस्मिता हे कार्ड चाललं, तर कलाईग्नार ह्यांचा पुत्र म्हणून स्टॅलिनला थोडा फायदा निश्चित आहे. तामिळनाडूतल्या स्त्रियांवर जयललितांचा जबरदस्त प्रभाव होता. त्यांच्यानंतर हा जवळजवळ अर्धा मतदार असलेला स्त्रीवर्ग कुठे वळतो, ह्यावरही बरंच काही अवलंबून असेल.

Tamil Nadu Assembly Election 2021 Results Live

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात