बॉम्बस्फोटाचा वचपा काढण्यासाठी तालिबानचा इसिसच्या ठिकाणांवर हल्ला


विशेष प्रतिनिधी

काबुल – तालिबानने हल्ले करत इसिसचे काही ठिकाणं उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात इसिसचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. काल मशिदीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या बॉम्बस्फोटात किमान पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून तालिबानने इसिसवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.Taliban attacks on ISIS

तालिबानने म्हटले की, काबूल शहरातील एका मशिदीबाहेर स्फोट झाल्यानंतर काही वेळातच तालिबानच्या दहशतवाद्यांनी शहरातीलच इसिसच्या ठिकाणांवर हल्ले केले. यावेळी तालिबानचे इसिसचे एक तळ संपूर्णपणे नष्ट केले. उत्तर काबूलमधील खैर खानाच्या जवळच इसिसच्या एका तळावर कारवाई करण्यात आली.तालिबानच्या हल्ल्यात इसिसचे किती दहशतवादी ठार झाले आणि तालिबानचे किती दहशतवादी जखमी झाले, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, कालच्या स्फोटप्रकरणी तीन संशयितांना अटक केल्याचे प्रवक्ता बिलाल करिमी याने म्हटले आहे.

Taliban attacks on ISIS

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण