राजधानीत दिल्लीत ७५ वर्षातला उन्हाळ्याचा विक्रम मोडला, आग ओकणाऱ्या सूर्याचा प्रकोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीकरांना गेल्या तब्बल पाऊण शतकाहून जास्त वर्षांत मार्चमधील सर्वाधिक उन्हाळ्याने त्रस्त केले. आगामी दोन दिवसांत उन्हाळ्याची जबरदस्त लाट दिल्लीसह मध्य व उत्तर प्रदेश प्रदेश तसेच राजस्थानच्या काही भागांत येईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. मैदानी प्रदेशातील कोणत्याही हवामान केंद्रांवर तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्यास ती उष्णतेची लाट मानली जाते. soaring temperature in New Delhi, Rajasthan and MP

राजधानी दिल्लीतील पारा आज ४० अंशांच्या वर गेला आणि तापत्या झळा आणि सकाळी ९-१० पासूनच आग ओकणाऱ्या सूर्याचा प्रकोप एप्रिल -मे मध्ये आणखी किती वाढणार, या आशंकेने दिल्लीकर आताच धास्तावले आहेत.दिल्लीत मार्चमधील सर्वसामान्य तापमानापेक्षा तब्बल ८ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आणि पारा ४०.१ अंशांवर गेला. १९४५ नंतर म्हणजे ७६ वर्षांनी यंदा मार्चमध्ये प्रथमच राजधानीतील हवा इतकी तापली आहे. दिल्लीबरोबरच राजस्थान व मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट आली आहे. या सर्व ठिकाणी मार्च अखेरीस असतो त्यापेक्षा सामान्यतः ५ ते ७ अंशांनी पारा वर गेला आहे.

soaring temperature in New Delhi, Rajasthan and MP

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*