तामिळनाडूतील सभेत मोदींनी आठवण काढली बंगाली माँ यांची शोवा मुजुमदारांची आणि जया अम्मांच्या अपमानाची; सौगात दिली नारी सन्मानाची

वृत्तसंस्था

धारापूरम – बंगाल आणि तामिळनाडूतला प्रचार शिगेला पोहोचला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारापूरमच्या आजच्या सभेत प्रचाराचा टोनच बदलून टाकला. बंगालमध्ये ममतादीदी आणि तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्याभोवती फिरणाऱ्या प्रचार मोहिमेला नारीशक्तीचा अपमान आणि नारीशक्तीच्या सन्मानाचे स्वरूप दिले. Shova Majumdar lost her life in West Bengal. We saw with horror how goons belonging to TMC brutally attacked her just because her ideology was different pm modi

तामिळनाडूच्या धारापूरमच्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी बंगाली माँ शोवा मुजुमदारांच्या शोचनीय मृत्यूचा उल्लेख केला. ते म्हणाले, तिकड़े ममतादीदींच्या तृणमूळच्या गुंडांनी ८५ वर्षांच्या शोवा मुजुमदार यांना मारले. का… तर त्यांची विचारधारा फक्त वेगळी होती. पण इथल्या घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या दोन घराण्यांना म्हणजे गांधी आणि करूणानिधींच्या घराण्यांना त्याचे काहीही वाटलेले नाही. त्यांनी शोवा मुजुमदारांच्या शोचनीय मृत्यूबद्दल चकार शब्द काढलेला नाही.करूणानिधींच्या डीएमकेचे टूजी घोटाळ्यात अडकलेले नेते ए. राजा उघडपणे मुख्यमंत्री पळणीस्वामी यांच्या मातेचा अपमान करतात आणि राजांचे नेते स्टॅलिन मुकाटपणे ते ऐकून घेतात. राजांना दटावतही नाहीत. नारीशक्तीचा अपमान करणे त्यांची फितरतच आहे.

२५ मार्च १९८९ या दिवसाची मोदींनी तामिळ जनतेला आठवण करून दिली. ते म्हणाले, तो दिवस तुम्ही विसरू नका. त्याच दिवशी तामिळनाडूच्या विधानसभेत डीएमकेच्या नेत्यांनी अम्मा जयललितांचा कसा अपमान केला होता… त्यांच्याशी कशी गैरवर्तणूक केली होती, याची आठवण ठेवा. त्या दिवशी डीएमकेच्या सदस्यांनी विधानसभेत जयललिता यांच्या पदराला हात घालण्याचे दुःसाहस केले होते. त्यावेळी देशभर डीएमकेची निर्भत्सना झाली होती.

डीएमके आणि काँग्रेसला महिलांचा सन्मान ठेवता येत नाही. त्यांच्याच आधीच्या राजवटीत महिलांवरचे अत्याचार वाढले होते. उलट एनडीएच्या राजवटीत उज्ज्वला योजनेपासून जनधन योजनेपर्यंत आणि स्वच्छ भारत अभियानापासून प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत सगळ्या योजनांमध्ये नारीशक्तीचा सन्मान ठेवला गेल्याची आठवण मोदींनी करवून दिली.

Shova Majumdar lost her life in West Bengal. We saw with horror how goons belonging to TMC brutally attacked her just because her ideology was different pm modi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*