धक्कादायक घटना : चेन्नईत कोरोना तपासणीसाठी नमुने घेत असतानाच सिंहाचा आणि बिबट्याचा मृत्यू , जाणून घ्या कारण


 

प्राणीसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पीटीआयसोबत बोलताना म्हटलं, की 18 वर्षीय मादा बिबट्याचं नाव जया होतं आणि तिचा मृत्यू श्वास घेण्यास त्रास होत असल्याने झाला आहे.Shocking  The death of a lion and a leopard while taking samples for corona examination in Chennai, find out the cause


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : मुंबईच्या वीर जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नुकतच एका वाघिणीच्या बाछड्याच आगमन झालं.या बछड्याच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण करण्यात आलं.तर दुसरीकडे कोरोना तपासणीसाठी नमुने घेत असतानाच सिंहाचा आणि बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

देशभरात कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने देखील हाहाकार मजवला आहे.कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच सोमवारी कोरोना तपासणीसाठी नमुने घेत असतानाच सिंहाचा आणि बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना तमिळनाडूच्या अरिगनार अण्णा या प्राणीसंग्रहालयात घडली.

या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राणीसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पीटीआयसोबत बोलताना म्हटलं, की 18 वर्षीय मादा बिबट्याचं नाव जया होतं आणि तिचा मृत्यू श्वास घेण्यास त्रास होत असल्याने झाला आहे. पुढे त्यांनी सांगितलं, की 5 वर्षीय सिंहाचं नाव विष्णू असं होतं आणि अन्ननलिकेत असलेल्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

तसेच प्राणीसंग्रहालयातील तब्बल 70 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, की कर्मचारी आधीपासूनच क्वारंटाईन आहेत. आम्हाला अशी शंका होती, की प्राणीही कोरोनाबाधित होऊ शकतात.म्हणून आम्ही त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.

Covid Symptoms: तज्ज्ञ सांगतात, प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावं लागतं. मागील वर्षीही 23 वर्षीय कविता नावाच्या सिंहिणीचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तिला कॅन्सरही होता.

Shocking  The death of a lion and a leopard while taking samples for corona examination in Chennai, find out the cause

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात