संजय राठोडांना एक न्याय, अनिल देशमुखांना दुसरा न्याय; शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; अनिल देशमुखांचे खाते बदलून मलमपट्टीचा डाव!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सचिन वाझे –अनिल देशमुख खंडणीखोरी प्रकरणात राजकीयदृष्ट्या अडकलेल्या माना सोडविण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात फेरबदल करून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या खात्यामध्ये बदल करण्याचे घाटत आहे. shivsena leaders unrest; double standerds of NCP from sanjay rathod to anil deshmukh exposed

ज्येष्ठ नेते शरद पवार अनिल देशमुखांना पाठीशी घालत असल्याबद्दल शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता असून राष्ट्रवादी स्वतःच्या मंत्र्यांना कोणत्याही अतिगंभीर बाबींपासूनही वाचविते पण शिवसेना नेतृत्वाला आपल्या पक्षातल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाचवू देत नाही, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचीच तक्रार आहे.गेल्या काही दिवसांपासून विरोधी भाजपने राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरले आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सरकारवर दबावही आणत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे – पवार सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच हे बदल होणार असल्याची चर्चा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यांकडून गृहखाते काढून घेऊन त्यांच्याकडे दुसरे खातं सोपविले जाण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख अशा एक नव्हे तर दोन मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या मंत्र्याचा बचाव करतात. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर कोणतीही चौकशी होण्याआधीच त्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला लावला. यातून शिवसेनेने बंजारा समाजाचा पाठिंबा गमावल्याची भावना शिवसेनेच्या नेत्यांची आहे.

शिवसेनेच्या संजय राठोडांना एक न्याय आणि अनिल देशमुख – धनंजय मुंडे यांना दुसरा न्याय याबद्दल शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपासून शिवसैनिकांपर्यंत प्रचंड अस्वस्थता आहे.

shivsena leaders unrest; double standerds of NCP from sanjay rathod to anil deshmukh exposed

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*