खबरदारी ओमिक्रॉनची : सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी मागितली मंजुरी, नव्या व्हेरिएंटवर नव्या लसीची शक्यता


ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपली कोरोना लस कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध नियामकांकडून मंजुरी मागितली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळे ही मंजुरी मागितली गेली आहे. Serum Institute of India seeks approval for booster dose of Covishield amid Fear Of Omicron


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपली कोरोना लस कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध नियामकांकडून मंजुरी मागितली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळे ही मंजुरी मागितली गेली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील पहिली कंपनी आहे जिने कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी मान्यता मागितली आहे. नॅशनल टेक्निकल ग्रुप ऑन इम्युनायझेशन आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप फॉर कोरोना व्हॅक्सिनेशन हादेखील बूस्टर डोसच्या वैज्ञानिक बाबींवर विचार करत असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. ओमिक्रॉन प्रकार समोर आल्यानंतर राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक आणि केरळ या राज्यांनीही बूस्टर डोससाठी केंद्राकडे मंजुरी मागितली आहे.


ओमिक्रॉनची धास्ती, पुण्यात पुन्हा निर्बंध लागू; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका ?


दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सीरमचे प्रमुख अदार पूनावाला म्हणाले होते की, कदाचित ऑक्सफर्डचे वैज्ञानिक नवीन लसीचा शोध घेत आहेत, जी या नवीन प्रकाराविरुद्ध बूस्टर डोस म्हणून काम करेल.

कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत प्रथम नोंदवण्यात आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, या प्रकारात म्युटेशनची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये जास्तीत जास्त फरक असल्याने, हा आधीच्या प्रकारांपेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना हा प्रकार आढळून आला त्यांनी त्यांचे लसीकरण पूर्ण केले होते. आतापर्यंत 25 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. तथापि, भारतात अद्याप रुग्ण आढळलेला नाही.

Serum Institute of India seeks approval for booster dose of Covishield amid Fear Of Omicron

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात