जेष्ठ नेते ‘आझादांना’ कॉंग्रेसने केले ‘आझाद’ : घाबरलेल्या कॉंग्रेस हायकमांडने स्टार प्रचारकांच्या यादीतून गुलाम नबी आझादांना वगळले ; ‘हा कॉंग्रेसचा अंत’ ; फोडा आणि राज्य कराचा फंडा

  • गुलाम नबी आझाद यांना पक्षीय कामकाजातून वगळण्यात आले आहे.मात्र जी-23 नेत्यांच्या सुपूत्रांना केले स्टार प्रचारक. कॉंग्रेस आपला फोडा आणि राज्य करा चा जुना फंडा पुन्हा एकदा वापरताना दिसत आहे.

  • पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत गुलाम नबी आझाद प्रचारास जाणार नाहीत. कॉंग्रेस हाय कमांडने गुलाम नबी आझाद यांना आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे यातून हे स्पष्ट होते की कुठेतरी
    कॉंग्रेसला आझादांची भिती वाटत आहे. Senior leader ‘Azad’ made by Congress ‘Azad’

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: काँग्रेसच्या कार्यपद्धतीला आव्हान देत नवा फ्रंट तयार करणाऱ्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना वेसण घालण्याची तयारी हायकमांडने केली आहे. जी-२३ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनाच आत्ता पक्षीय कामकाजातून वगळण्यात आले आहे.पंतप्रधान मोदींची केलेली तारीफ त्यांना चांगलीच महागात पडली आहे.गुलाम नबी आझाद पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला जाणार नाहीत. कॉंग्रेस पूर्णपणे त्यांना डावलण्याच्या मूडमध्ये आहे.

मनीष तिवारी यांचा मुलगा आणि भूपेंद्र हूडा यांना जी -23 मधील बंडखोरी रोखण्यासाठी स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश कॉंग्रेसमध्येही या निर्णयावरून हलचल तीव्र झाली आहे.

काँग्रेस नेतृत्वाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी तयार केली असून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा यात समावेश केलेला नाही. मात्र जी-२३ च्या गटात असलेल्या नेत्यांपैकी मनीष तिवारी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या पुत्राला स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्या माध्यमातून या नेत्यांच्या गटामध्ये फूट पाडण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने केल्‍याची चर्चा रंगली आहे.

गुलाम नबी आझाद हे जी-२३ नेत्यांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर होत असलेले काँग्रेसचे पतन रोखण्यासाठी काँग्रेसकडून संघटनात्मक सुधारणांची मागणी या गटाकडून करण्यात आली आहे. या गटातील नेत्यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी २८ फेब्रुवारी रोजी काश्मिरमध्‍ये गुलाम नबी आझाद यांच्यासोबत भूपेंद्र हुड्डा, मनीष तिवारी, राज बब्बर, कपिल सिब्बल यांच्यासह काही नेत्यांनी एक कार्यक्रम आयोजित करून गांधी कुटुंबाला आव्हान दिले होते. त्यानंतर गुलाम नबी आझाद आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला एकजूट ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांना देण्यात आल . त्या सध्या जम्मू-काश्मीरच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

Senior leader ‘Azad’ made by Congress ‘Azad’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*