एकवीरा आईच्या दारी हलाल मांसाची विक्री; हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट


प्रतिनिधी

मुंबई : सध्या भारतात हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून मुस्लीम समांतर अर्थव्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी हिंदू व्यापाऱ्यांना हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे.  Selling halal meat at Ekvira Mother’s door

आता हलाल मांसाची मुसलमान उघडपणे विक्री करत आहेत. चक्क कार्ल्याच्या श्री एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात सर्रासपणे मुसलमानांनी हलाल मांस विक्रीची दुकाने थाटली आहेत. त्यावर ‘हलाल मटण मिळेल’, असे लिहिण्यात आले आहे. हिंदूंच्या मंदिर परिसरात एकतर मांसविक्रीची दुकाने असू नयेत, असे असताना श्री एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात मात्र मांस विक्रीची दुकाने उभी केली आहेत आणि ती देखील हलाल मांसाची आहेत, त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सध्या हलालच्या विरोधात महाराष्ट्रासह भारतात जनक्षोभ पसरला आहे. महाराष्ट्रात हलाल विरोधी कृती समिती स्थापन झाली आहे. या समितीने १२-१३ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘हलाल शो’ला इतका विरोध झाला की, नाईलाजास्तव हा कार्यक्रम आयोजकांना रद्द करावा लागला. मात्र आता याच समितीकडे श्री एकवीरा देवीच्या मंदिर परिसरातील हलाल मटण विक्रीची दुकाने बंद करण्यात यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गावकरी या समितीकडे अपेक्षेने पाहत आहे.

“सध्या मंदिर परिसरात मद्यमांस यांची विक्री करणारी दुकाने उघडपणे सुरु होत असल्याचे दिसत आहे. मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी मंदिरापासून २ किमी अंतरापर्यंत मांस विक्री होऊच नये, अशी अपेक्षा आहे. त्या दुकानावर शासनाने प्रतिबंध आणावा. त्याचबरोबर जी जागृत देवस्थाने आहेत, त्यामुळे ही सर्व मंदिरे मद्य – मांस मुक्त करण्यात यावीत, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करत आहोत. जे अन्य धर्मीय हिंदूंच्या देवतांना मानत नाहीत, ते मंदिर परिसरात येऊन व्यवसाय करत आहेत. श्री एकवीरा मंदिर परिसरात मांस विक्रीची दुकाने असू नयेतच, तिथे हिंदूंसाठी निषिद्ध असलेले हलाल मांसाची विक्री होते, हे तर हिंदूंचा धर्म भ्रष्ट करण्यासारखी आहे, त्याला आमच्यासह सर्व संघटनाची विरोध आहे.”
सुनील घनवट, महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगड संघटक, हिंदू जनजागृती समिती

काय आहे हे प्रकरण? 

लोणावळा येथे कार्ल्याची श्री एकवीरा देवी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ही देवी ठाकरे कुटुंबाची कुलदेवता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम देवीच्या दर्शनासाठी जायचे, त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे हेही या देवीच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे हे मंदिर आणखी प्रसिद्ध झाले आहे. अशा मंदिराला मात्र मुसलमानांचा विळखा बसला आहे का?, अशी शंका यावी असा प्रकार समोर आला आहे

मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर मटण विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या दुकानांच्या फलकावर ‘येथे बोकडाचे आणि ब्रॉयलर हलाल मटण मिळेल’, ‘येथे ताजे व स्वच्छ हलाल चिकन मिळेल’, असे छापण्यात आले आहे.

या सर्व दुकानांची नावे मात्र ‘जय मल्हार मटण शॉप ऍण्ड चिकन शॉप’, ‘आई एकवीरा मटण अँड चिकन शॉप’, ‘जय आंबिका मटण अँड चिकन शॉप’ ‘पाप्या चिकन सेंटर’ अशी चक्क हिंदूंची आहेत. असे असतांना या दुकानांच्या नावाखाली मात्र बिनधास्तपणे ‘ताजे हलाल मटण, चिकन मिळेल’, असे लिहिले आहे.

Selling halal meat at Ekvira Mother’s door

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण