सत्यमेव जयते!, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर..


भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करून ते म्हणाले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार, सत्यमेव जयते! Satyamev Jayate Devendra Fadnavis reaction after the suspension of 12 BJP MLAs was canceled, read in detail


वृत्तसंस्था

पणजी : भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करून ते म्हणाले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार, सत्यमेव जयते!

फडणवीस सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. या निर्णयाचं स्वागत करताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महाविकास आघाडील सणसणीत चपराक बसली आहे. राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर होता. संविधानाला धरून नव्हता. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, सत्यमेव जयते! ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनात आमच्या आमदारांनी आवाज उठवला. त्यावेळी या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि कोर्टाचे आभार मानतो. कोर्टाचा हा निर्णय लोकशाही मूल्य वाचवणारा असून दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीला सणसणीत चपराक लगावणारा आहे. या सरकारने घेतलेला हा निर्णय असंवैधानिक होता. नैतिकमूल्यांना धरून नव्हता. निरपेक्ष नव्हता. हा निर्णय बेकायदेशीर होता, असंही ते म्हणाले.

भाजपच्या सर्व आमदारांचं अभिनंदन करत ते म्हणाले की, राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं मी आधीपासून सांगत होतो. हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं मी नमूद केलं होतं. कृत्रिम संख्याबळाच्या जोरावर सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयामागे कोणतंही महत्त्वाचं कारण नव्हतं. म्हणूनच कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं आणि आमच्या बाजूने निकाल दिला. हा केवळ 12 आमदारांचा प्रश्न नव्हता तर 12 मतदारसंघातील 50 लाखांहून अधिक नागरिकांचा प्रश्न होता, असं सांगतानाच डेमोक्रसी सेव्हड असंही ट्वीट त्यांनी केलं आहे.

Satyamev Jayate Devendra Fadnavis reaction after the suspension of 12 BJP MLAs was canceled, read in detail

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात