Russia – Ukraine war cartoons : रशियन अस्वल ते बायडेनच्या ढांगेखालून निघालेला पुतिन; कार्टून – मिम्समधून मार्मिक भाष्य!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध भडकल्यानंतर जगभरातील मीडिया युद्धाच्या विविध अंगांनी बातम्या देत असताना सोशल मीडियावर कार्टून्स आणि मिम्सच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. जगभरातील व्यंगचित्रकारांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे चित्र हिटलरच्या रुपात रेखाटले आहे, तर अनेकांनी छोटे व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर सादर करून पुतिन हे युक्रेनची शिकार करायला गेले असले तरी ते स्वतः शिकार बनतील, असे म्हटले आहे. Russia – Ukraine war cartoons

त्याचबरोबर अनेकांनी रशियन प्रतीक म्हणून पुतिन यांना रशियन अस्वलाच्या रूपात दाखवले आहे. सर्वसाधारण कार्टून्स मध्ये दुसऱ्या महायुद्धात जी कार्टुन्स काढली गेली त्यांचा प्रभाव दिसतो. ब्रिटीशांचा सिंह, भारतीयांचा वाघ तसा रशियन यांचा अस्वल अशी प्रतीके त्या काळात वापरली जायची. जगभरातील व्यंगचित्रकारांनी त्याचेच अनुकरण करत पुतिन आणि रशिया हे अस्वलाच्या रूपात दाखवून ते युक्रेनला गिळंकृत करत आहेत, असे दाखवले आहे. अमेरिकेतला द विक ने हे कार्टून छापले आहे.

अनेकांनी अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे पुतिन यांच्यापुढे कशी निष्प्रभावी ठरली आहेत. पुतीन हे अमेरिका आणि युरोपियन देशांच्या धमक्यांना कशी भीक घालत नाही, असेही व्यंगचित्रांमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Russia – Ukraine war cartoons

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात