बिहार विधानसभेतील गोंधळाने दाखवून दिले की नितीशकुमार आरएसएस-भाजपाई झालेत, राहूल गांधी यांची टीका

बिहार विधानसभेत झालेल्या गोंधळाने दाखवून दिले आहे की मुख्यमंत्री नितीशकुमार हे पूर्णपणे आरएसएस-भाजपाई झाले आहेत. लोकशाही मानत नसणाऱ्याना सरकार म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मात्र, आम्ही विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या हितात बोलतच राहू, असे कॉँग्रेसचे आमदार राहूल गांधी यांनी म्हटले आहे.  Ruckas in Bihar Assembly shows that Nitish Kumar has become RSS-BJP, criticizes Rahul Gandhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बिहार विधानसभेत झालेल्या गोंधळाने दाखवून दिले आहे की मुख्यमंत्री नितीशकुमार हे पूर्णपणे आरएसएस-भाजपाई झाले आहेत. लोकशाही मानत नसणाऱ्याना सरकार म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मात्र, आम्ही विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या हितात बोलतच राहू, असे कॉँग्रेसचे आमदार राहूल गांधी यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षांनीच विधानसभेत गोंधळ घातला. विधेयक मागे घेण्याची मागणी करत विरोधी पक्षाचे आमदार विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धावत आले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या कक्षाबाहेर पाऊल टाकण्यापासूनही रोखले. त्यांनी चर्चेत सहभागी व्हायला हवे, होते असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.बिहार विधानसभेत सशस्त्र पोलीस दल विधेयक-२०२१ वरून मोठा गदारोळ आणि हिंसा झाली. गोंधळ रोखण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं. कुठल्याही स्थितीत विधेयक मंजूर होऊ नये यावर अडून बसलेले राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या आमदारांविरोधात पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. विरोधी पक्षाच्या आमदारांना धक्के मारून आणि काहींचे पाय खेचून बाहेर काढण्यात आलं.

विरोधी पक्षाच्या महिला आमदारांनाही अशाच प्रकारे सभागृहाबाहेर काढले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहा आणि सभागृहा परिसरात जोदराद गोंधळ घातला. हा गदारोळ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की अखेर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना मोठ्या संख्येत पोलीस बळ विधानभवनात बोलवावं लागलं. यावेळी आमदारांसोबत पोलिसांच्या झटापटीचे व्हिडिओ व्हायरल झाले.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी थेट विधानसभा अध्यक्षांना घेरल्याने आणि कक्षाच्या प्रत्येच दारावर ठिय्या दिला. दारं दोरखंडांनी बांधल्याचा आरोप आहे. स्थिती चिघळत असल्याचे पाहून पाटणाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली. मोठ्या पोलीस बळासोबत ते विधानसभेत दाखल झाले. मग हिंसक झालेल्या आणि बळजबरी करणाऱ्या आमदारांना फरफट विधानसभेतून पोलिसांनी बाहेर काढलं. यावेळी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव हे विधानसभेत उपस्थित होते.

Ruckas in Bihar Assembly shows that Nitish Kumar has become RSS-BJP, criticizes Rahul Gandhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*