विक्रम संपत विरोधी मोहिमेत विद्यापीठीय विद्वानांच्या यादीत रामचंद्र गुहांचेही नाव; पण रामचंद्र गुहांनी ठामपणे केला इन्कार!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सावरकर चरित्रकार प्रख्यात इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांच्या विरोधात परकीय विद्यापीठांमधील डाव्या विद्यापीठीय विद्वानांनी सुरू केलेल्या बदनामीच्या मोहिमेत इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा भगोडा संस्थापक झाकीर नाईक याच्या बरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सामील होऊन डाव्या विद्वानांनी लिहिलेल्या खुल्या पत्रावर स्वाक्षरी केल्याची बातमी आली. संजय राऊतांकरवी त्याचा इन्कारही करण्यात आला.Ramchandra Guha flatly refused

पण याच यादीत महात्मा गांधींचे चरित्रकार रामचंद्र गुहा यांचेही नाव असल्याचे स्पष्ट झाले. आता रामचंद्र गुहा यांनी आपण असले कोणतेही पत्र पाहिलेले नाही आणि त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असा स्पष्ट खुलासा आपल्या ट्विटर हँडल वरून केला आहे. संबधित पत्राकडे माझे नुकतेच लक्ष वेधण्यात आले. पण मी रामचंद्र गुहा किंवा राम गुहा या दोन्ही नावांपैकी पैकी कोणत्याही नावाने या पत्रावर नावाने स्वाक्षरी केलेली नाही, असे रामचंद्र गुहा यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

डॉ. विक्रम संपत यांनी लोकसंगीत या विषयात पीएच डी मिळवली आहे. ते लंडनच्या रॉयल हिस्टरी सोसायटीचे फेलो आहेत. त्यांनी आपल्या संशोधन ग्रंथात वांङमय चौर्य अर्थात साहित्याची चोरी केली आहे. तसेच सावरकर चरित्रातील पहिल्या खंडात अशीच साहित्याची चोरी केली आहे, असा दावा पाश्चात्य विद्यापीठीय विद्वान ऑड्रेय ट्रश्के, अनन्या चक्रवर्ती, रोहित चोपडा यांनी करून त्यांच्या विरोधात मोहीम चालवली आहे. या मोहिमेविरोधात विक्रम संपत यांनी दिल्ली उच्च न्यायालयातून दिलासा मिळवला आहे. विक्रम संपत यांच्याविरोधात इथून पुढे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बदनामीकारक मजकूर टाकता येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

त्यानंतर आता काही विद्यापीठीय विद्वानांनी विक्रम संपत यांचे नाव वगळून वांग्मङय चोरी अर्थात साहित्य चोरी याविषयी आपण व्यापक मोहीम राबवत असल्याचे म्हणत खुले पत्र रॉयल हिस्ट्री सोसायटीला लिहिले आहे. यामध्ये अनेक विद्वान प्राध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्राध्यापकांमध्ये इस्लामिक रिसर्च फाउंडेशन भगोडा संस्थापक झाकीर नाईक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या दोघांचीही संबंधित खुल्या पत्रावर स्वाक्षरी आहे. झाकीर नाईक विरोधात मोस्ट वांटेड म्हणून भारत सरकारने नोटीस जारी केली आहे. भारतातून पळून जाऊन तो सध्या मलेशियात असल्याचे सांगण्यात येते. या झाकीर नाईकच्या नावाखाली संजय राऊत यांचे नाव आहे. तसेच त्यापुढे शिवसेना असे देखील स्पष्ट लिहिलेले आहे.

मात्र, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपण स्वतः संजय राऊत यांच्याशी बोललो असून त्यांनी कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचा खुलासा केला आहे, असे ट्विट केले आहे. परंतु स्वतः संजय राऊत हे मात्र याबद्दल अद्याप मौन बाळगून आहेत. या संदर्भातले ट्विट विक्रम संपत यांनी देखील केले आहे. संजय राऊत यांना काहीही माहिती नसताना त्यांची स्वाक्षरी परस्पर विद्यापीठीय विद्वानांनी घेतली आहे. ही त्यांची “शैक्षणिक कामगिरी” आहे, असा टोला लगावत बाकीच्या स्वाक्षरी असलेल्या विद्यापीठीय प्राध्यापकांनी देखील आपापली नावे पाहून घ्यावीत, असे विक्रम संपत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. संपत यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्विट आपल्या ट्विटमध्ये जोडले आहे.

– नेमकी स्टोरी काय?

विक्रम संपत यांच्या विरोधात मोहीम चालवणाऱ्या तीन प्राध्यापकांना विक्रम संपत यांनी दिल्ली न्यायालयात खेचले आहे. हे तिघे भारतविरोधी कारवायांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झाले होते. तसेच ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित ऑनलाईन चर्चासत्राचेहा ते समर्थक होते. या तीन प्राध्यापकांनी विक्रम संपथ यांची बदनामी केली आहे.

विक्रम संपत यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. २०१९ साली ‘सावरकर : इकोज फ्रॉम ए फॉरगाटेन पास्ट 1883-1924’ आणि २०२१ साली ‘सावरकर: ए कन्टेस्टेड लिगसी 1924-1966’ अशी ही दोन पुस्तके आहेत. या पुस्तकांना जगभरातून मागणी आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकांचा समावेश झाला आहे. हीच बाब डाव्या विचारवंतांना खुपत आहे. त्यांतील तीन प्राध्यापकांनी संपत यांच्या विरोधात तर मोहीमच चालवली. त्यांच्यामध्ये ऑड्रेय ट्रश्के हे प्रमुख आहेत. ऑड्रेय ट्रश्के या रुत्जर्स विद्यापीठाशी संलग्न आहेत, तर अनन्या चक्रवर्ती या जॉर्ज टाउन विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि रोहित चोपडा हे सांता क्लारा विद्यापीठाशी संबंधीत आहेत.

ऑड्रेय ट्रश्के हिंदू विरोधी कटकारस्थान रचणा-यांमध्ये केंद्रस्थानी आहेत. ते अमेरिकेत भारत विरोधी कट कारस्थानांमध्ये सहभागी होते. काही महिन्यांपूर्वी ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते, ज्यामध्ये ते प्रमुख वक्ता होते आणि आयोजकांपैकी एक होते. त्यांनी ‘औरंगजेब: द मैन एंड द मिथ’ या पुस्तकात मुघल राजांचे गोडवे गायले आहेत. त्यांना मानवतावादी, संवेदनशील, न्यायप्रिय आणि पत्नीशी एकनिष्ठ असल्याचे दर्शवले आहे. त्याचवेळी औरंगजेबने हिंदूंवर झिझया कर लावला होता, हिंदूंची मंदिरे तोडली, याबाबत मात्र ऑड्रेय ट्रश्के काहीही बोलत नाहीत.

काय आहे प्रकरण? 

विक्रम संपत यांनी वीर सावरकर यांच्यावर २ पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांविषयी या तीन प्राध्यापकांनी संपथ यांच्यावर कॉपीराइट, रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला होता. या प्रकरणी या प्राध्यापकांनी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीला पत्र लिहिले. हे पत्र सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाले. त्यामध्ये ऑड्रेय ट्रश्के यांच्यासह अनन्या चक्रवर्ती आणि रोहित चोपड़ा हेही सहभागी आहेत.

न्यायालयाने स्वीकारली याचिका 

विक्रम संपत हे अनेक वर्षांपासून डाव्या विचारवंतांचे लक्ष्य बनले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन पुस्तके लिहिल्यानंतर ते अमेरिकेमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या केंद्रस्थानी आले. अशा वेळी भारत विरोधी कारस्थाने रचणारे त्यांना टार्गेट करत आहेत.

यासाठी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीसोबत पत्रव्यवहार करून ते गैरसमज निर्माण करत आहेत. ज्याला डाव्या विचारवंतांनी सोशल मीडियावर उचलून धरले आहे. या सर्व प्रकारावर प्रतिबंध आणण्यासाठी विक्रम संपथ हे दिल्ली उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली आहे.

विक्रम संपत यांना पाठिंबा

प्रखर राष्ट्रवादी विचारांचे लेखक विक्रम संपत यांना समर्थन मिळत आहे. त्यामध्ये अनेक लेखक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग आहे. त्यामध्ये सुहेल सेठ यांचा समावेश आहे. त्यांनी विक्रम संपत यांनी लिहिलेल्या पुस्तकांची प्रशंसा केली.

I HAVE READ ALL OF @VIKRAMSAMPATH ‘S BOOKS. HIS INTELLECTUAL INTEGRITY IS ABOVE REPROACH. AS IS HIS SCHOLASTIC BREATH. FOR THOSE DOLTS QUESTIONING EITHER, THEY WOULDN’T BE ABLE TO STRING A SENTENCE IF ASKED BY THEIR OWN CONSCIENCE : SO THEY SHOULD JUST STFU.

— SUHEL SETH (@SUHELSETH) FEBRUARY 13, 2022

लेखक आणि अर्थशास्त्रज्ञ संजीव संन्याल यांनी विक्रम संपत यांच्याविरोधात षड्यंत्र रचणा-यांचा खरपूस समाचार घेतला.

AS MANY OF YOU ARE AWARE, @VIKRAMSAMPATH IS CONSTANTLY ATTACKED PERSONALLY BY THE LEFT CABAL FOR THE CRIME OF WRITING A BOOK ABOUT SAVARKAR. THE LATEST IS THAT HE IS ACCUSED OF PLAGERISM. THE EVIDENCE IS VERY WEAK AS EXPLAINED BELOW 1/N

— SANJEEV SANYAL (@SANJEEVSANYAL) FEBRUARY 13, 2022

Ramchandra Guha flatly refused

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात